मुंबई, 11 ऑगस्ट : सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड येईल हे सांगता येत नाही. वर्ल्ड कपवेळी सुरू झालेल्या #bottlecapchallenge ची चर्चा अजुनही सुरू आहे. हे चॅलेंज भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, सध्याचा सलामीवीर शिखर धवन यांनी पूर्ण केलं आहे. आता विराट कोहलीनेसुद्धा चॅलेंज पूर्ण केलं आहे. विंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचे काही व्हिडिओ सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी जडेजानं रोहित शर्माची फिरकी घेतली होती त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता विराटने बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण करून त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. विराटनं शेअर केलेल्या 15 सेकंदाच्या व्हिडिओत तो बॅटनं बाटलीचं टोपन उघडतो. क्रिकेटच्या मैदानावर खूप कमीवेळा विराट रिव्हर्स शॉट खेळताना दिसला आहे. मात्र बॉटल कॅप चॅलेंजसाठी त्यानं हा शॉट खेळला. त्याच्या बॉटल कॅप चॅलेंजची चर्चा आणखी एका कारणाने होत आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींचं समालोचन व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला आहे. जेव्हा रवी शास्त्री समालोचन करायचे तेव्हाचा आवाज जोडण्यात आला आहे.
Better late than never.🏏😎#BottleCapChallenge pic.twitter.com/mjrStZxxTi
— Virat Kohli (@imVkohli) August 10, 2019
धवननं सुद्धा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात तो हातात बॅट घेऊन नेटमध्ये प्रॅक्टिस करताना दिसत आहे. मात्र तो चेंडूनं शॉट नाही तर, बॉटलचे कॅप उडवताना दिसत आहे. धवननं आपल्या ट्वीटमध्ये, “युवी पाजी हा आहे माझा बॉटल कॅप चॅलेंज (Bottle Cap Challenge) आज मी पहिल्यांदाच दुखापतीनंतर फलंदाजी करत आहे. मला आनंद वाटत आहे”, असे म्हटलं होतं. सर्वात आधी युवराजनं हे चॅलेंज केले होते. त्यानं हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी शिखर धवन, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि ख्रिस गेल यांना आव्हान केले होते. यावेळी युवी बॅटनं शॉट मारत बॉटलची कॅप उडवत आहे. VIDEO: आगमनाआधीच बाप्पा पाण्यात, मनाला चटका लावणारं गणपती कारखान्याचं दृष्य