त्रिनिदाद, 11 ऑगस्ट : भारताचा विंडीजविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना रविवारी सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला 26 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. यासाठी त्याला फक्त 19 धावांची गरज आहे. विंडीज विरुद्धच्या सामन्यात तो 19 धावा केल्यास पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांचा विक्रम मागे टाकेल. पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी 1993 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. आता विराटला त्यांचा एक विक्रम मोडण्यासाठी फक्त 19 धावांची गरज आहे. मियाँदाद यांनी विंडीजविरुद्ध 64 डावात 1930 धावा केल्या होत्या. आता विराटला यासाठी 19 धावा हव्या असून तो ही कामगिरी फक्त 34 डावात करू शकेल. विराटने आतापर्यंत 33 डावात 1912 धावा केल्या असून यात सात शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. या तुलनेत मियाँदाद यांनी फक्त एक शतक आणि 12 अर्धशतकं केली आहेत. टी20 मालिकेत विराट कोहलीनं भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. त्यानं 106 धावा केल्या. दोन्ही संघामध्ये केरॉन पोलार्डनं 115 धावा केल्या आहेत. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली आहे. त्यानंतर सुरू झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पावसाने खोडा घातला. 13 षटकांनंतर सामना रद्द करण्यात आला. VIDEO: आगमनाआधीच बाप्पा पाण्यात, मनाला चटका लावणारं गणपती कारखान्याचं दृष्य
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.