धोनीच्या निवृत्तीवर बातमीवर निवड समितीच्या प्रमुखांचा मोठा खुलासा

धोनीच्या निवृत्तीवर बातमीवर निवड समितीच्या प्रमुखांचा मोठा खुलासा

टीम इंडियाचा माजी कप्तान आणि ऑलराउंडर विकेटकीपर M S Dhoni क्रिकेटला कायमचा संन्यास घेणार असल्याची बातमी सोशल मीडियावरून वाऱ्यासारखी पसरली आहे. आज संध्याकाळी 7 वाजता पत्रकार परिषद अशा बातम्याही शेअर झाल्या.

  • Share this:

मुंबई, 12 सप्टेंबर : टीम इंडियाचा माजी कप्तान आणि ऑलराउंडर विकेटकीपर M S Dhoni क्रिकेटला कायमचा संन्यास घेणार असल्याची बातमी सोशल मीडियावरून वाऱ्यासारखी पसरली आहे. आज संध्याकाळी 7 वाजता पत्रकार परिषद घेऊन क्रिकेट संन्यास जाहीर करणार अशा अर्थाच्या बातम्या शेअर झाल्या. Team India चा कप्तान विराट कोहली याने ट्वीट केलेला एक फोटो पाहून चाहत्यांनी आणि क्रिकेट रसिकांनी धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू केली. पण त्यात कुठलंही तथ्य नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. क्रिकेट नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीच ही बातमी दिली. निवड समितीचे प्रमुख MSK Prasad यांनी धोनीच्या निवृत्तीचं वृत्त खोटं असल्याचं सांगितलं आहे. एम एस के प्रसाद यांनी एम एस धोनीच्या निवृत्तीविषयी काहीही माहिती आमच्याकडे नाही. सोशल मीडियात फिरणारं वृत्त चुकीचं आहे, असं म्हटलं आहे.

सोशल मीडियावर या धोनीचा क्रिकेट संन्यास चर्चेत आला त्यामागे कॅप्टर विराट कोहली याचं एक ट्वीट होतं. गुरुवारी विराटने त्याच्या Twitter हँडलवरून एक मेसेज केला. विराटने या मेसेजबरोबर एक फोटो ट्वीट केला आहे. त्यात तो धोनीपुढे झुकून त्याचा सन्मान करत असल्याचं दिसतंय. या माणसाने त्या दिवशी मला असं काही धावायला लावलं होतं की मी फिटनेस टेस्ट देत होतो जणू... स्पेशल नाईट... त्या दिवशीचा खेळ मी कधीच विसरणार नाही!

असं ट्वीट या फोटोबरोबर विराटने केलं. या ट्वीटवरून चाहते वेगवेगळे अर्थ काढायला लागले. धोनीचं योगदान, या माजी कप्तानाचा हातखंडा, त्याचं कौशल्य याचं असं अचानक कौतुक विराट करतोय म्हणजे धोनीकडून काही मोठी बातमी येऊ शकते, अशी अटकळ आहे.

हे वाचा - अंत्यसंस्कारानंतर सुरू होती श्राद्धाची तयारी, अचानक घरी पोहोचला मृत तरुण!

धोनीने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण वन डे आणि टी20 क्रिकेट धोनी खेळतो आहे. आता या दोन प्रकारांतूनही निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे.

माहीला नेहमीच धक्कातंत्र आवडतं. कोणी कल्पना केली नसेल अशा वेळी अचानक मोठा निर्णय जाहीर करण्याची धोनीची सवय आहे. 2014-15 मध्ये धोनीने असंच अचानक ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरू असताना मध्येच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर 2017 मध्ये धोनीने लिमिटेड ओव्हर फॉरमॅटमध्ये कप्तानपदही असचं अचानक सोडलं होतं.

हे वाचा - टीम इंडियाविरुद्ध 14 वर्षीय गोलंदाजाची 'बल्लेबल्ले', मोडला 23 वर्षांचा विक्रम

इंग्लंड दौऱ्याच्या सुरुवातीलाच त्याने कॅप्टन्सीचा राजीनामा दिला आणि मग विराट कोहलीकडे संघाची धुरा आली. त्यामुळे काहीही चर्चा नसताना आज धोनी क्रिकेट संन्यास जाहीर करू शकतो.

-------------------------------------

तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीत गटाराचं पाणी तर नाही? धक्कादायक VIDEO समोर

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: September 12, 2019, 5:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading