टीम इंडियाच्या फंलदाजीला 14 वर्षीय गोलंदाजानं लावला सुरूंग, मोडला 23 वर्षांचा विक्रम

टीम इंडियाच्या फंलदाजीला 14 वर्षीय गोलंदाजानं लावला सुरूंग, मोडला 23 वर्षांचा विक्रम

अवघ्या 14 वर्षीय गोलंदाजानं भारताच्या कर्णधारासह चार फलंदाजांना बाद केलं. यासह त्यानं 23 वर्षांपूर्वीचा शोएब मलिकचा विक्रम मोडला.

  • Share this:

कोलंबो, 11 सप्टेंबर : अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघानं त्यांच्या पहिल्या कसोटी विजयाची नोंद करताना अनेक विक्रम प्रस्थापित केले. त्यांच्यापाठोपाठ आता अंडर 19 संघानंसुद्धा पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलंबोत सुरू असलेल्या अंडर 19 आशियाई चषकात अफगाणिस्तानच्या संघानं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. भारताविरुद्ध केलेल्या कामगिरी तर चर्चेचा विषय ठरली आहे. दोन्ही संघात झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात 14 वर्षीय गोलंदाजानं भारतीय खेळाडूंना दमवलं. त्याने पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकचा 23 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

14 वर्षीय चायनामन गोलंदाज नूर अहमदने भारताविरुद्ध चार विकेट घेतल्या. यासह यूथ वनडेमध्ये चार विकेट घेणाऱ्या सर्वात कमी वयाचा गोलंदाज ठरला आहे. नूरचे वय 14 वर्ष 249 दिवस आहे. त्यानं शोएब मलिकचा विक्रम मोडला आहे. शोएबनं 1996 मध्ये 15 वर्षांचा असताना इंग्लंडविरुद्ध 38 धावात 4 विकेट घेतल्या होत्या.

अंडर 19 मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात पुरुष आणि महिला दोन्हीमध्ये फक्त एकच खेळाडू नूर अहमदच्या बाबतीत पुढे आहे. पाकिस्तानच्या साजिदा शाहनं 2001 मध्ये 13 वर्ष 68 दिवस वय असताना नेदरलँडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 22 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या.

नूरनं त्याच्या गोलंदाजीवर भारताचा कर्णधार ध्रुव जुरेल, सलिल अरोरा, तिलक वर्मा, अथर्व अंकोलेकर यांना बाद केलं. ध्रुवला खातंही उघडता आलं नाही. तर सलामीवीरी सलील 29 धावा, तिलक एक आणि अथर्व 7 धावांवर बाद झाले.

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या संघाला 124 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताच्या सुशांत मिश्रानं 20 धावांत 5 गडी बाद केले. तर अंकोलकरने 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताची दमछाक झाली. फक्त 3 फलंदाजांनाच 15 पेक्षा जास्त धावा करता आल्या. यात अर्जुन आझाद 21 धावा तर अरोरा आणि शाश्वत रावत यांनी प्रत्येकी 29 धावा काढल्या.

वाहतूक पोलिसाची मुजोरी! सर्वसामान्यावर दमदाटी करत मारली लाथ VIDEO VIRAL

Published by: Suraj Yadav
First published: September 11, 2019, 1:33 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading