मुंबई, 12 मार्च: आयपीएल 2022 ची धामधूम सुरू होण्यासाठी आता काहीच कालावधी शिल्लक आहे. यावर्षी आयपीएल अधिक रंजक होणार आहे कारण यंदा आठ नाही तर दहा टीम्स खेळताना दिसणार आहे. या टीम्सच्या नावापासून, कोण कॅप्टन असणार, संघात कोण कोण असणार अशी उत्सुकता क्रिकेट रसिकांनी होती. दरम्यान आता या टीम्सबाबतची माहिती हळू हळू उलगडू लागली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) अशा या दोन टीम्स यंदा आयपीएल खेळणार आहेत. दरम्यान क्रिकेट फॅन्सना अशीही उत्सुकता आहे की या दोन्ही टीम्सची जर्सी कशी असणार. याबाबत सांगण्याचं कारण म्हणजे लखनऊ सुपर जायंट्सची जर्सी लाँच आधीच सोशल मीडियावर लीक झाली आहे. मात्र ही जर्सी काही चाहत्यांच्या पसंतीस उतरली नसल्याचं सोशलमीडियावरील कमेंट्सवरुन दिसत आहे.
Leaked #Jersey shade of #lucknowiplteam during #Badshah promotional video
— Sports Theory (@theory_sports) March 10, 2022
Color shade = Blue of Turquoise shade#Ipl #KLRahul #LSG #IPLAuction pic.twitter.com/ooidvoRTnU
सोशल मीडियावर लखनऊ सुपर जायंट्सच्या फ्रेश जर्सीचा फोटो व्हायरल झाला आहे. पण युजर्सनी या जर्सीची तुलना टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘गोकुलधाम प्रीमियम लीग’मधील जर्सीशी केली आहे. लखनऊने ही जर्सी ‘गोकुलधाम प्रीमियम लीग’पासून प्रेरणा घेत बनवल्याचं ट्वीट करत अनेकांनी याबाबत खिल्ली उडवली आहे.
#LucknowSuperGiants
— SuperGiantsArmy™ — LSG FC (@LucknowIPLCover) March 9, 2022
HERE-WE-GO, leaked footage of the ongoing shoot of @LucknowIPL theme song featuring @Its_Badshah. 🎶📹 #JerseyReveal 👀💙🧡#WeAreSuperGiants | #IPL2022#TATAIPL2022 #TataIPL #IPL pic.twitter.com/DSekgZmyNE
क्रिकेटरसिकांनी थेट ट्रोल केलं आहे की, लखनऊ सुपर जायंट्सनी ही जर्सी गोकुलधाम प्रीमयम लीगमधून कॉपी करण्यात आली आहे.
Looks like Lucknow super giants copied jersey from "gokuldham premium league" pic.twitter.com/VMJYdxamTM
— Mask (@lolwa_op) March 11, 2022
लखनऊच्या जर्सीसंदर्भात जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर-गायक बादशाह आहे. मीडिया अहवालांच्या मते टीमच्या थीम साँगचे शूटिंग करतानाचा हा व्हिडीओ आहे आणि तो सोशल मीडियावर लीक करण्यात आला आहे. यामध्ये बादशाह ब्लू टर्कोइश रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसतो आहे, ज्यावर लखनऊ सुपर जायंट्सचा लोगो देखील आहे. अनेकांनी बादशाहचे फोटो पोस्ट करताना त्याची तुलना करण्यासाठी गोकुलधाम सोसायटीमधील कलाकारांचे फोटो देखील पोस्ट केले आहेत.
युजर्सनी दावा केला आहे की ही जर्सी तारक मेहता.. मधून कॉपी करण्यात आली आहे. ‘Jersey Inspiration’ अशी कॅप्शन देत काहींनी बादशाह आणि भिडे गुरुजींचा फोटो कोलाज करून पोस्ट केला आहे.