Home /News /sport /

CWG2022: वेटलिफ्टर लवप्रीत सिंगनं उचललं विक्रमी वजन, भारताच्या खात्यात आणखी एक पदक

CWG2022: वेटलिफ्टर लवप्रीत सिंगनं उचललं विक्रमी वजन, भारताच्या खात्यात आणखी एक पदक

वेटलिफ्टर लवप्रीत सिंगनं उचललं विक्रमी वजन, भारताच्या खात्यात आणखी एक पदक

वेटलिफ्टर लवप्रीत सिंगनं उचललं विक्रमी वजन, भारताच्या खात्यात आणखी एक पदक

CWG2022 - पुरुषांच्या 109 किलो गटात लवप्रीतनं विक्रमी वजन उचलताना कांस्यपदकाची कमाई केली. भारताचं वेटलिफ्टिंगमधलं आतापर्यंतचं हे नववं पदक ठरलं. तर लवप्रीतच्या या कामगिरीनंतर भारताची एकूण पदकसंख्या 14 वर पोहोचली आहे.

    बर्मिंगहॅम, 03 ऑगस्ट – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताची ‘भार’दस्त कामगिरी सुरुच आहे. आज सहाव्या दिवशी लवप्रीत सिंगनं भारताला आणखी एक पदक मिळवून दिलं. पुरुषांच्या 109 किलो गटात लवप्रीतनं विक्रमी वजन उचलताना कांस्यपदकाची कमाई केली. भारताचं वेटलिफ्टिंगमधलं आतापर्यंतचं हे नववं पदक ठरलं. तर लवप्रीतच्या या कामगिरीनंतर भारताची एकूण पदकसंख्या 14 वर पोहोचली आहे. लवप्रीतनं आधी स्नॅचमध्ये 163 किलो वजन उचललं. त्यानंतर क्लिन अँड जर्कमध्ये 192 किलो असं मिळून विक्रमी 355 किलो वजन उचललं. या कामगिरीसह त्यानं स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढन नवा विक्रम प्रस्थापित केला. महत्वाची बाब ही की लवप्रीतचे या स्पर्धेतले सगळे प्रयत्न यशस्वी ठरले. स्नॅचमध्ये पहिल्या प्रयत्नात 157 किलो, दुसऱ्या प्रयत्नात 161 किलो तर तिसऱ्या प्रयत्नात 163 किलो उचलण्याची कामगिरी बजावली. त्यानंतर क्लिन अँड जर्कमध्येही 185, 189 आणि त्यानंतर 192 किलो वजन उचलत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं. क्लीन अँड जर्कच्या आपल्या शेवटच्या फेरीपर्यंत लवप्रीत अव्वल स्थानावर होता. पण त्यानंतर कॅमेरुन आणि सॅमोआच्या वेटलिफ्टर्सनी बाजी मारत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावलं. कशी आहे लवप्रीत सिंगची कारकीर्द? 24 वर्षांचा लवप्रीत सिंग मूळचा पंजाबच्या अमृतसरचा आहे. २०१० साली वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यानं वेटलिफ्टिंगला सुरुवात केली होती. सात वर्षांच्या अथक परिश्रमानंतर तो नॅशनल कॅम्पमध्ये दाखल झाला. लवप्रीत सिंगनं राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीपमध्ये रौप्यपदक पटकावलं होतं. याच कामगिरीच्या जोरावर तो बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. त्याआधी 2017 साली एशियन ज्युनियर चॅम्पियनशीपमध्येही कांस्यपदक आणि राष्ट्रकुल ज्युनियर चॅम्पियनशीमध्ये तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. हेही वाचा - CWG Cricket: सचिन, लक्ष्मणलाही नाही जमलं ते हरमनची टीम इंडिया करणार? आज शेवटची संधी राष्ट्रकुल 2022 मध्ये पदकविजेते भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू – सुवर्ण  (49 किलो, महिला) जेरेमी लालरिनुंगा – सुवर्ण  (67 किलो, पुरुष) अचिंता शेउली – सुवर्ण  (73 किलो, पुरुष) संकेत सरगर – रौप्य (55 किलो, पुरुष) बिंदियारानी – रौप्य (55 किलो, महिला) विकास ठाकूर – रौप्य (96 किलो, पुरुष) गुरुराजा – कांस्य (61 किलो, पुरुष) हरजिंदर कौर – कांस्य (71 किलो, महिला) लवप्रीत सिंग – कांस्य (109 किलो, पुरुष)
    Published by:Siddhesh Kanase
    First published:

    Tags: Record, Sport

    पुढील बातम्या