जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / रोनाल्डोच्या प्रतिस्पर्धी क्लबकडून मेस्सीला मोठी ऑफर, प्रस्ताव स्वीकारल्यास होणार विक्रम

रोनाल्डोच्या प्रतिस्पर्धी क्लबकडून मेस्सीला मोठी ऑफर, प्रस्ताव स्वीकारल्यास होणार विक्रम

Ronaldo and Messi

Ronaldo and Messi

लियोनेल मेस्सीने हा प्रस्ताव स्वीकारला तर फोर्ब्जच्या यादीत मेस्सी जगात सर्वाधिक पैसे मिळवणारा फुटबॉलपटू आणि एथलिट बनेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

दिल्ली, 05 मे : दिग्गज फुटबॉलपट्टू लियोनेल मेस्सीसुद्धा आता ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता आहे. लियोनेल मेस्सीला सौदी अरब क्लब अल हिलालकडून प्रस्ताव मिळाला आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अर्जेंटिनाच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाच्या कर्णधाराच्या जवळच्या सूत्रांनी अशी माहिती दिलीय. अद्याप अल हिलालकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सौदी क्लबकडून मेस्सीला वार्षिक 400 मिलियन डॉलर्सचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर फोर्ब्सने म्हटलं की, अल नस्रचा प्रतिस्पर्धी क्लब असलेल्या अल हिलालने लियोनेल मेस्सीला त्यांच्यासोबत येण्यासाठी वर्षाला 400 मिलियन युरो म्हणजेच जवळपास 3 हजार 600 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. IPLमध्ये फ्लॉप ठरूनही रसेलचा मोठा विक्रम, गेल अन् पोलार्डच्या ग्रुपमध्ये मिळवलं स्थान फोर्ब्जने हे वृत्त ट्रान्सफर मार्केट तज्ज्ञ फॅब्रीजिओ रोमानो आणि सौदी गॅजेटच्या हवाल्याने दिलीय. यात म्हटलंय की, लियोनेल मेस्सीने हा प्रस्ताव स्वीकारला तर फोर्ब्जच्या यादीत मेस्सी जगात सर्वाधिक पैसे मिळवणारा फुटबॉलपटू आणि एथलिट बनेल. मेस्सी सौदी अरबच्या टुरिझम ब्रँड एम्बेसडर आहे. तर रोनाल्डोने डिसेंबर 2022 मध्ये सौदीतील क्लब अल नस्रसोबत वर्षाला जवळपास 1800 कोटी रुपयांचा करार केला आहे. मेस्सी सध्या फ्रान्सच्या पेरिस सेंट जर्मनचा भाग आहे. त्याला क्लबने दोन आठवड्यासाठी निलंबित केलं आहे. परवानगीशिवाय सौदी अरबला गेल्याचा त्याच्यावर आरोप आहे. निलंबन काळात मेस्सीला सराव करण्यासाठीही मंजुरी दिली जाणार नाही. मेस्सीला निलंबन कालावधीत सॅलरी मिळणार नाही. तसंच त्याचा या हंगामातील पॅरिस सेंट जर्मनसोबतचा करारही संपुष्टात येत आहे. हंगामाच्या शेवटी मेस्सी पॅरिस सेंट जर्मन सोडू शकतो. 2021 मध्ये मेस्सीने क्लबसोबत करार केला होता. 2022 मध्ये फ्रान्सचा युवा खेळाडू किलियन एम्बाप्पे जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मेस्सी होता. मेस्सीची कमाई 130 मिलियन डॉलर इतकी होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: football
  • First Published :
जाहिरात
जाहिरात