मुंबई, 5 मे : आयपीएल 2023 मध्ये केकेआरचा अष्टपैलू क्रिकेटर आंद्रे रसेल अद्याप चमकदार कामगिरी करू शकलेला नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत तो अपयशी ठरला आहे. दरम्यान, सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने 15 चेंडूत दोन षटकार आणि एका चौकारासह 24 धावांची खेळी केली. या दोन षटकारांसह त्याने टी20 क्रिकेटच्या इतिहासात 600 षटकार मारण्याची कामगिरी केलीय. टी20 मध्ये 600 षटकार मारणारा तो तिसरा फलंदाज बनलाय. रसेलच्या आधी टी 20 क्रिकेटमध्ये 600 षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल आणि किरॉन पोलार्ड या दोघांच्या नावावर आहे. ख्रिस गेलने आतापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये एकूण 1 हजार 56 षटकार मारले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पोलार्डने 812 षटकार मारले आहेत. आता तिसऱ्या क्रमांकावर आंद्रे रसेल पोहोचला आहे. ख्रिस गेलने 463 सामन्यात 1056 षटकार मारले आहेत तर पोलार्डने 625 सामन्यात 812 षटकार मारले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रसेलने 446 सामन्यात 600 षटकार मारलेत. IPL 2023 : केएल राहुल आयपीएलनंतर आता WTC Final लाही मुकणार? यंदाच्या आयपीएलमध्ये रसेलची बॅट तळपलेली नाही. केकेआरकडून 10 सामन्यात त्याला फक्त 166 धावाच करता आल्या आहेत. त्याची सरासरी फक्त 20.75 इतकी आहे तर स्ट्राइक रेट 148.21 इतका आहे. त्याने यामध्ये 10 चौकार आणि 13 षटकार मारले आहेत. यंदाच्या हंगामात केकेआरने 10 सामन्यापैकी 4 सामने जिंकले असून 6 सामने गमावले आहेत. सध्या त्यांचे 8 गुण झाले असून गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहेत. केकेआरच्या कर्णधाराने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु केकेआरच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. केकेआरने पहिल्या पाच ओव्हरमध्येच 3 महत्वाच्या विकेट गमावल्या. केकेआरकडून जेसन रॉयने 20, नितीश राणाने 42, रिंकू सिंहने 46, अँड्री रुसेलने 24 तर अनुकूल रॉयने 13 धावा केल्या. हैदराबादच्या गोलंदाजांना केकेआरच्या 9 विकेट्स घेण्यात यश आले. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. हैदराबादकडून मयांक अग्रवालने 18, राहुल त्रिपाठीने 20, एडन मार्करमने 41, हेनरीचने क्लासेनने 36 तर अब्दुल समदने 21 धावा केल्या. परंतु विजयासाठी मिळालेले 272 धावांचे आव्हान त्यांना पूर्ण करता आले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







