मायामी, 16 जुलै : दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीचे जगभरात अब्जावधी चाहते आहेत. फुटबॉलपटू मेस्सी हा कारचा शौकिनही आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात मेस्सी एका मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावल्याचं दिसतं. मेस्सी रेड लाइटमध्ये घुसल्याने अपघाताची शक्यता होती. मेस्सी त्याच्या कुटुंबियांसह ऑडी क्यू 8 कारने मायामी शहरात निघाला होता. यावेळी कार दुर्घटना थोडक्यात टळली. ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात लिहिलं आहे की, मेस्सी रेड लाइटमध्ये गेला होता. यानंतर फ्लोरिडा पोलीसांनी त्याला घरी सोडलं. एका ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. बाबा, तुम्ही आनंदी आहात ना? शतकानंतर वडिलांना कॉल करताच रडला यशस्वी
🚨 | Messi went through a red light. 😭Luckily he was being escorted home by a Florida State Police car.
— FCB Albiceleste (@FCBAlbiceleste) July 14, 2023
pic.twitter.com/mT8daiYK2g
लियोनेल मेस्सी पीएसजी सोडून आता मियामीमध्ये गेला आहे. अद्याप त्याने मियामीकडून पदार्पण केलेलं नाही. 2021 मध्ये मेस्सीने त्याच्या निर्णयासह सर्वांनाच धक्का दिला होता. त्याने म्हटलं होतं की आता मी बार्सिलोना फुटबॉल क्लब ला लीग क्लब 1 सोबत करार करणार आहे. मेस्सीच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी अर्जेंटीनाने फिफा वर्ल्ड कप जिंकला होता. फ्रान्सला अंतिम सामन्यात 4-2 अशा फरकाने हरवून मेस्सीचं वर्ल्ड कपचं स्वप्न पूर्ण झालं होतं. अर्जेंटिनाने अखेरचा वर्ल्ड कप 1986 मध्ये जिंकला होता.