मुंबई, 14 एप्रिल: आयपीएलच्या ( ipl 2022 ) महाकुंभात अनेक किस्से घडत असतात. या मॅचसह या स्पर्धेत अनेक तरुणींच्या रिअॅक्शन्स सर्वांचे लक्ष केंद्रित करत असतात. अशीच एक तरुणी (mystery girl) सध्या चर्चेत आली आहे. मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरआणि चेन्नई सुपर किंग्ज (RCB vs CSK) यांच्यात झालेल्या सामन्यात जरी आरसीबीला पराभवाला सामोरे जावे ला गले असले, तरी सोशल मीडियावर बेंगळुरूच्या फॅन गर्लचा बोलबाला पाहायला मिळत आहे. मंगळवारी जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ फलंदाजी करत होता त्यांच्या विकेट्स सातत्याने पडत होत्या. फलंदाज दिनेश कार्तिकने जेव्हा धावांचा वेग वाढवत होता त्याच्या एका शॉटवर तरुणीची ही प्रतिक्रिया समोर आली. लाल आणि पांढऱ्या रंगाच्या टॉपमध्ये स्टँडवर उपस्थित असलेल्या या दोन तरुणींच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
Csk won..
— Vishal ♥️ (@Fans4AlexZverev) April 12, 2022
Rcb back to their original form 🤣
Sorry girls #CSK𓃬 #CSKvsRCB pic.twitter.com/fVYqjvBquD
सुरुवातीला दोघीही आनंदाने स्विंग करत होते, पण आरसीबीची विकेट पडताच दोघीही खूप दुःखी झाल्या आणि त्यांची तीच दु:खी प्रतिक्रिया स्क्रीन दिसून आली. काही वेळातच दोघींच्या रिएक्शनवर सोशल मीडियावरही अनेक कमेन्ट्स व्हायरल झाल्या. कॅमेरामन आरसीबीच्या या तरुणीचे करिअर बनवले आहे. असे ट्विटरवर पोस्ट व्हायरल होत आहे. कॅमेरामन आरसीबीच्या या तरुणीचे करिअर बनवण्यात गुंतले आहे, असे ट्विटमध्ये लिहिले होते.
Cameraman is about make career of that RCB girl in red top now.
— 𝐑𝐀𝐘 💜 (@RayyLH44) April 12, 2022
Congratulations to her for her 1M Insta followers, Verified tick, Brand deals and Yess I will enjoy Maldives photo dump with her lame rich BF. #CSKvsRCB #IPL
आयपीएल 2022 मध्ये मिस्ट्री गर्ल्स सतत पाहायला मिळत आहेत. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात एका मिस्ट्री गर्लचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. याआधी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत एक मुलगीही दिसली होती. चेन्नईचा पहिला विजय आरसीबीविरुद्धच्या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या सीएसकेने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 216 रन केल्या. शिवम दुबेने (Shivam Dube) 46 बॉलमध्ये नाबाद 95 रन केले, यात 5 फोर आणि 8 सिक्सचा समावेश होता. उथप्पाने (Robin Uthappa) 50 बॉलमध्ये 88 रनची खेळी केली.

)







