सिडनी, 05 जानेवारी : क्रिकेटपटूंना जगभरातील वेगवेगळ्या लीगमध्ये क्रिकेट खेळण्याचे पैसे मिळतात. मात्र आता बिग बॅश लीग या स्पर्धेतील क्रिकेटपटूंनी प्रत्येक सिक्ससाठी 18 हजार रुपये देणार आहे. मात्र या मागे एक चांगले कारण आहे. बिग बॅश लीगमधील हे खेळाडू ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया येथे लागलेल्या आगीत झालेल्या हानीच्या मदतीसाठी हातभार लावणार आहेत. ऑस्ट्रेलियात लागलेल्या या आगीमुळे याचा फटका अनेक कुटुंबाना बसला. त्यामुळं अशा कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी क्रिकेटपटू पुढे सरसावले आहे. यासाठी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल, धडाकेबाज फलंदाज ख्रिस लिन आणि डावखुरा फलंदाज डार्सी शॉर्ट या तिघांनी या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये हे तिन्ही खेळाडू प्रत्येक षटकार मारल्यानंतर 250 डॉलर्स निधी देणार आहेत. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरियामध्ये लागलेल्या आगीत सर्वात जास्त नुकसान झाले आहे. वाचा- भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या गोलंदाजानं घेतली निवृत्ती!
वाचा- CAAवर पहिल्यांदाच बोलला कॅप्टन कोहली, सामन्याआधी केले मोठे वक्तव्य याबाबत ख्रिस लिननं ट्वीट करत माहिती दिली. लिनने, सध्या बिग बॅश लीगमध्ये मी जेवढे षटकार मारेन, त्या प्रत्येक षटकारासाठी मी 250 डॉलर्स निधी देईन. विविध क्रीडापटू नैसर्गिक संपत्ती वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे पाहणे खूप चांगला अनुभव आहे, असे लिहिले आहे. वाचा- पॅडमध्ये अडकली बॅट अन् उडाली दांडी! क्रिकेटमधला हा मजेशीर VIDEO एकदा पाहाच
मुख्य म्हणजे सप्टेंबरपासून लागलेल्या या आगीत आतापर्यंत तब्बल 5 लाख वन्यजीवांना आपला जीव गमावला आहे. या आगीत आतापर्यंत 18 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण अजून बेपत्ता आहेत.