जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / गंभीरच्या हेल्मेटवर आदळला चेंडू, आफ्रिदीच्या कृतीने जिंकले मन; पाहा VIDEO

गंभीरच्या हेल्मेटवर आदळला चेंडू, आफ्रिदीच्या कृतीने जिंकले मन; पाहा VIDEO

Gautam Gambhir and Shahid Afridi

Gautam Gambhir and Shahid Afridi

गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी लीजेंड लीग क्रिकेटमध्ये उद्घाटनाच्या सामन्यात आमने सामने आले होते. नाणेफेक करत असताना दोघांमध्ये खुन्नसही बघायला मिळाली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 मार्च : लीजेंड लीग क्रिकेट मास्टर्सचा उद्घाटनाचा सामना काल एशिया लायन्स विरुद्ध इंडिया महाराजा यांच्यात झाला. शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली एशिया लायन्सने या सामन्यात गौतम गंभीर कर्णधार असलेल्या इंडिया महाराजाला पराभूत केलं. गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी या सामन्यात आमने सामने आले होते. नाणेफेक करत असताना दोघांमध्ये खुन्नसही बघायला मिळाली. दरम्यान, गंभीरच्या हेल्मेटला चेंडू लागताच आफ्रिदी विचारपूस करायला पुढे आल्याचंही दिसलं. इंडिया महाराजा एशिया लायन्सने दिलेल्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना गंभीर ४३ धावांवर खेळत होता. त्यावेळी १२ व्या षटकात अब्दुल रज्जाकचा चेंडू गंभीरच्या हेल्मेटवर लागला. हेल्मेटच्या पुढच्या फ्रेमवर चेंडू लागल्यानंतर आफ्रिदी सर्वात आधी गंभीरजवळ गेला आणि गंभीरला लागलं तर नाही ना असं विचारलं. यावर गंभीरने हातानेच इशारा करत ओके असल्याचं सांगितलं. भारतात 8 सामन्यात ड्रिंक्स पुरवले, संधी मिळताच केली 6 वर्षात कुणालाही न जमलेली कामगिरी गौतम गंभीरने १३ व्या षटकात आफ्रिदीच्या गोलंदाजीवर चौकार मारत अर्धशतक पूर्ण केलं. मात्र १४ व्या षटकात अब्दुल रज्जाकच्या गोलंदाजीवर ५४ धावांवर तो बाद झाला. यानंतर इंडिया महाराजाच्या विकेट ठराविक अंतराने पडत गेल्या आणि अखेरीस आवश्यक धावसंख्या वाढली. इंडिया महाराजा १५६ धावांपर्यंतच मजल मारू शकली.

जाहिरात

इंडिया महाराजाचा कर्णधार गौतम गंभीरने ३९ चेंडूत ५४ धावा केल्या. तर आशिया लायन्सचा फलंदाज मिस्बाह उल हकने सर्वाधिक ७३ धावा केल्या. यात त्याने २ चौकार आणि ४ षटकार मारले. शाहिद आफ्रिदी फक्त १२ धावाच करू शकला. तर ४ षटकात ३५ धावा दिल्या पण एकही विकेट त्याला घेता आली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात