अहमदाबाद, 10 मार्च : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने भारतीय गोलंदाजांना सलग दुसऱ्या दिवशीही घाम फोडला. त्याने कॅमेरून ग्रीनसोबत द्विशतकी भागिदारी करत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारून दिलीय. पहिल्या दिवशी खेळ संपल्यानतंर ख्वाजाने भारतातील शतकाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी तो भावुकसुद्धा झाला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी चहापानापर्यंत ७ बाद ४०९ धावा झाल्या होत्या. चहापानानंतर लगेचच अक्षर पटेलने उस्मान ख्वाजाला १८० धावांवर पायचित करत भारताला मोठं यश मिळवून दिलं. ख्वाजा पहिल्या दिवशी शतक केल्यानतंर बोलताना म्हणाला होता की, शतकानंतर खूप साऱ्या भावना मनात आहेत. हा एक मोठा प्रवास होता. मी याआधी दोन वेळा भारतात आलो आहे. ८ कसोटी सामन्यात मी मैदानावर ड्रिंक्स घेऊन आलो. एक फलंदाज म्हणून भारतात शतक करण्याची ईच्छा होती. ना मुलींकडे पाहतो, ना वाईट बोलतो, विराटने सांगितलं सज्जन अन् धार्मिक खेळाडुचं नाव गेल्या १२ वर्षात भारतात कसोटी शतक करणारा तो पहिला डावखुरा फलंदाज आहे. त्याच्या आधी ऑस्ट्रेलिया मार्कस नॉर्थने २०१०-११ मध्ये बंगळुरुत शतक केलं होतं. गेल्या सहा वर्षा भारतात पूर्ण दिवस फलंदाजी करणाराही उस्मान ख्वाजा पहिलाच ठरलाय. त्याच्या आधी श्रीलंकेचा दिनेश चांदीमलने २०१७ मध्ये दिल्ली कसोटीच्या तिसरा दिवस खेळून काढला होता. खाव्जाच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी ४ बाद २४९ धावा केल्या होत्या. तर आज दुसऱ्या दिवशी लंचनंतर चहापानापर्यंत ७ बाद ४०९ धावा केल्या. यात उस्मान ख्वाजाने कॅमेरून ग्रीनसोबत द्विशतकी भागिदारी केली. कॅमेरून ग्रीन शतक करून बाद झाला. तर उस्मान ख्वाजा १८० धावांवर खेळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.