Home /News /sport /

गावसकरांचं विराट आणि अनुष्काबाबत 'वादग्रस्त' विधान; अत्यंत लज्जास्पद..सोशल मीडियावर चाहते भडकले

गावसकरांचं विराट आणि अनुष्काबाबत 'वादग्रस्त' विधान; अत्यंत लज्जास्पद..सोशल मीडियावर चाहते भडकले

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्यादरम्यान गावसकर यांनी विराट आणि अनुष्कावर टिप्पणी केली होती

    मुंबई, 25 सप्टेंबर : गुरुवारी रात्री आयपीएल (IPL 2020) सामन्यात कॉमेंट्रीदरम्यान सुनील गावसकर यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या खासगी आयुष्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी याचा विरोध केला आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की, गावसकर यांच्यासारख्या महान फलंदाजाने अशा प्रकारे वक्तव्य करणं अपेक्षित नाहीत.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्यादरम्यान गावसकर यांनी विराट आणि अनुष्कावर टिप्पणी केली. विराट ठरला अपयशी आरसीबीचा कर्णधार विराट हा किंग्ज इलेव्हन पंजाबविरोधात सर्व ठिकाणी अपयशी राहिले. क्षेत्ररक्षण करीत असताना त्याने लोकेश राहुलचे दोन कॅच सोडल्या. राहुल याने 132 धावा काढल्या. त्यानंतर आरबीबी राहुल इतक्या धावा करू शकल्या नाहीत. विराटची बॅटिंग आणि कर्णधारपदावरही सवाल उपस्थित केला. त्यांनी जोश फिलीपसारख्या तरुण फलंदाजाला त्याच्याआधी फलंदाजी करण्यास पाठविले. फिलीप काही खास करू शकला नाही. यानंतर बँटिंग करण्यासाठी आलेल्या कोहलीने पाच बॉलवर केवळ एकच धाव काढली. विराटने चाहत्यांना केलं नाराज गावसकर यांच्या वक्तव्यानंतर विराट कोहरीचे चाहते नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर ते विविध पोस्टच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करीत आहेत. काही चाहत्यांनी बीसीसीआयकडे गावसकर यांना कॉमेंट्री पॅनलवर हटविण्याची मागणी केली आहे. गावसकरांनी केलेलं वक्तव्य येथे नमूद  शकत नाही. हे ही वाचा-IPL 2020 : धोनीच्या CSK ला पुन्हा एक धक्का; मॅचविनर खेळाडू संघातून बाहेर एक चाहता म्हणाला - गावसकर यांच्या सारख्या महान खेळाडूने कॉमेंट्रीदरम्यान अनुष्का आणि विराट यांच्या खासगी जीवनावर टिप्पणी करणे अत्यंत चुकीचे आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने सांगितले की, ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. प्रत्येक खेळाडूच्या जीवनात चांगले -वाईट प्रसंग येतात. विराटसाठी गुरुवारचा सामना चांगला राहिला नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Sunil gavaskar, Virat anushka

    पुढील बातम्या