मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /चांगले कपडे आणि शूज मिळतील म्हणून तिनं सुरु केलं हॉकी खेळणं; वाचा हॉकी स्टार नेहा गोयलचा प्रेरणादायी प्रवास

चांगले कपडे आणि शूज मिळतील म्हणून तिनं सुरु केलं हॉकी खेळणं; वाचा हॉकी स्टार नेहा गोयलचा प्रेरणादायी प्रवास

देशाला अभिमानास्पद यश मिळवून देणाऱ्या या संघातील एकेक खेळाडू म्हणजे स्वयंप्रकाशाने लखलखणारे रत्न आहे.

देशाला अभिमानास्पद यश मिळवून देणाऱ्या या संघातील एकेक खेळाडू म्हणजे स्वयंप्रकाशाने लखलखणारे रत्न आहे.

देशाला अभिमानास्पद यश मिळवून देणाऱ्या या संघातील एकेक खेळाडू म्हणजे स्वयंप्रकाशाने लखलखणारे रत्न आहे.

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारतीय महिला हॉकी संघाने (Indian Woman Hockey Team) इतिहास (History) रचला आहे. महिला हॉकीच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच महिला हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत (Semi Final) पोहोचला आहे. महिला हॉकी संघाच्या या यशाने देशभरात जल्लोष सुरू आहे. मात्र  आजचा उपांत्य फेरीचा अर्जेंटिनाशी (Argentina) झालेला सामना भारताला गमवावा लागला आहे. मात्र संपूर्ण देशाची मान या 16 मुलींच्या कामगिरीनं उंचावली आहे. आजतक डॉट इननं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    देशाला अभिमानास्पद यश मिळवून देणाऱ्या या संघातील एकेक खेळाडू म्हणजे स्वयंप्रकाशाने लखलखणारे रत्न आहे. यातील एक रत्न आहे नेहा गोयल (Neha Goyal). मिडफिल्डर (Mid Fielder) असणाऱ्या नेहाचा या यशापर्यंतचा संघर्षमय प्रवास थक्क करणारा आहे. विश्वास बसणार नाही; पण नेहाने चांगले कपडे आणि शूज मिळतील या आशेने हॉकी खेळायला सुरुवात केली होती.

    हे वाचा - IND vs ENG : ही दोस्ती तुटायची नाय! दिवगंत मित्रासाठी खरेदी केलं तिकीट, आणि...

    मूळची हरियाणामधील (Haryana) सोनीपतची (Sonipat) असलेली नेहा सहावीत असल्यापासून हॉकी खेळायला लागली. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. नेहाच्या वडिलांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे नेहा लहानपणापासूनच आपली आई सावित्री आणि बहिणींसोबत एका सायकल कारखान्यात काम करायला लागली होती. ती सहावीत असताना तिच्या एका मित्राने तिला हॉकी स्टिक दिली आणि सांगितलं की, हॉकी खेळल्याने चांगले शूज आणि कपडे मिळतील. नेहाने ते खरे मानून खेळायला सुरुवात केली आणि एके दिवशी नेहाला दोन हजार रुपयांचे बक्षीस मिळाले आणि त्यानंतर हॉकीवर तिचा जीवच जडला. तिच्या आईनेही तिला पाठिंबा दिला आणि तिला खेळाचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. मग मात्र नेहाने मागे वळून पाहिले नाही.

    2011मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पहिल्यांदा तिची ज्युनिअर वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवड झाली. त्यानंतर नेहाची 21 वर्षाखालील फोर-नेशन्स लालबहादूर शास्त्री महिला हॉकी स्पर्धेत निवड झाली. 2018मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक विजेत्या भारतीय संघाचा ती भाग होती. हॉकी इंडिया मिडफिल्डर ऑफ द इयर पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले आहे.

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास रचला, तेव्हा सोनीपतमध्ये मोठा जल्लोष करण्यात आला. नेहाची आई सावित्री यांनी आपल्या मुलीबद्दल अभिमान व्यक्त करत ती यावेळी देशासाठी पदक आणेल असा विश्वास व्यक्त केला. नेहा हे पदक आणेल तेव्हा तिचे असेच अभूतपूर्व जल्लोषात स्वागत केले जाईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

    First published:

    Tags: Hockey, Indian women's team, Olympics 2021