जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG : ही दोस्ती तुटायची नाय! दिवगंत मित्रासाठी खरेदी केलं तिकीट, आणि....

IND vs ENG : ही दोस्ती तुटायची नाय! दिवगंत मित्रासाठी खरेदी केलं तिकीट, आणि....

IND vs ENG : ही दोस्ती तुटायची नाय! दिवगंत मित्रासाठी खरेदी केलं तिकीट, आणि....

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये (India vs England 1st Test) प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मॅच पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या टेस्टमध्ये प्रेक्षकांमधील एक रिकामी खूर्ची सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नॉटिंगहम, 4 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये (India vs England 1st Test) प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मॅच पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या टेस्टमध्ये प्रेक्षकांमधील एक रिकामी खूर्ची सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.  पहिल्या दिवसाची सर्व तिकीटं पहिल्याच महिनाभरापूर्वीच हाऊसफुल झाली होती. मात्र त्यानंतरही ही खूर्ची रिकामी आहे. ही खूर्ची रिकामी असल्याचं कारण हे इमोशनल आहे. जॉन क्लार्क (John Clarke) या कट्टर क्रिकेट फॅनच्या  नावानं हे तिकीट खरेदी करण्यात आलेलं आहे. जॉन क्लार्क आज हयात नाहीत. तरीही त्यांनी गेल्या 40 वर्षांपासून ट्रेंट ब्रिजमध्ये होणारी एकही टेस्ट चुकवली नाही. त्यांचे मित्र जॉन यांची  आठवण जपण्यासाठी त्यांच्या नावानं ट्रेंट ब्रिजमधील प्रत्येक मॅचच्या वेळी तिकीट खरेदी करतात आणि त्यांची खूर्ची रिकामी ठेवतात. या अनोख्या मैत्रीची साक्ष देणारा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जाहिरात

नॉटींगहम टेस्टमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. रॉय बर्न्सला शून्यावरच बुमराहनं आऊट केलं. त्यानंतर झॅक क्राऊली देखील मोठा स्कोअर करु शकला नाही. त्याला सिराजनं 27 रनवर आऊट केले. त्यामुळे लंचपूर्वी इंग्लंडचा स्कोअर 2 आऊट 61 होता. लंचनंतर मोहम्मद शमीनं इंग्लंडला तिसरा धक्का दिला. त्याने डॉम सिबलेला आऊट केलं. सिबले आऊट झाल्यानंतर कॅप्टन जो रुटनं (Joe Root) जॉनी बेअरस्टोच्या (Jonny Bairstow) मदतीनं इंग्लंडची इनिंग सावरली. रुटनं त्याचं अर्धशतक 89 बॉलमध्ये पूर्ण केल. तब्बल 12 इनिंगनंतर रुटला अर्धशतक झळकावण्यात यश आलं आहे. भारत-इंग्लंड सीरिजच्या पहिल्याच टेस्टमध्ये रुटला गवसलेला फॉर्म हा टीम इंडियासाठी धोक्याचा इशारा आहे. IND vs ENG : मोहम्मद शमीनं केली मोठी चूक, ऋषभ पंतचा चेहरा पडला! रुटचं अर्धशतक पूर्ण होताच टीम इंडियानं इंग्लडला चौथा धक्का दिला. मोहम्मद शमीनं बेअरस्टोला आऊट करत इंग्लंडला चौथा धक्का दिला. त्यामुळे टी टाईमच्या वेळी इंग्लंडचा स्कोअर 4 आऊट 138 झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात