सिडनी, 27 ऑक्टोबर: नेदरलँडविरुद्ध टीम इंडियानं दणदणीत सुरुवात करताना 179 धावा स्कोअर बोर्डवर लावल्या. मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजयी खेळी करणारा टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनं आपला फॉर्म सिडनीतही कायम ठेवला. विराटनं पाकिस्तानपाठोपाठ नेदरलँडविरुद्धही नाबाद अर्धशतक झळकावलं. विराटसह कॅप्टन रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनीही अर्धशतकं झळकावली. त्यामुळे टीम इंडियानं 20 ओव्हरमध्ये 2 बाद 179 धावांची मजल मारली. विराटचं नाबाद अर्धशतक टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुल सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. आजच्या सामन्यात 9 धावा करुन तो बाद झाला. त्यामुळे तिसऱ्याच ओव्हरमध्ये विराट कोहली मैदानात आला. विराट आणि रोहितनं टीम इंडियाचा डाव पुढे नेला. रोहितनं 39 बॉलमध्ये 53 धावांची खेली केली. त्यानं विराटसह दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी साकारली. रोहित बाद झाल्यानंतर विराटनं सूर्यकुमारच्या साथीनं खेळाची सूत्र आपल्या हाती घेतली. विराटनं सिडनीच्या मैदानात यंदाच्या वर्ल्ड कपमधलं आपलं दुसरं अर्धशतक साजरं केलं. विराटनं नाबाद 62 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवनं डावाच्या शेवटच्या बॉलवर सिक्सर ठोकून आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. त्यानं अवघ्या 25 बॉलमध्ये नाबाद 51 धावा फटकावल्या. त्या दोघांनी 95 धावांची अभेद्य भागीदारी साकारली.
He enjoyed that one, did #KingKohli! 😲
— Star Sports (@StarSportsIndia) October 27, 2022
What was your reaction to this jaw-dropping hit over the covers for six?
ICC Men’s #T20WorldCup #INDvNED #BelieveInBlue #ViratKohli pic.twitter.com/bPOqOHD9RU
हेही वाचा - BCCI: बीसीसीआयचा ऐतिहासिक निर्णय, आता पुरुषांसह महिला क्रिकेटर्सना मिळणार इतकं मानधन… शेवटच्या 5 ओव्हरमध्ये 65 धावा टीम इंडियानं नेदरलँडविरुद्ध पहिल्या 15 ओव्हर्समध्ये 2 बाद 114 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर विराट आणि सूर्यकुमार यादवनं गिअर बदलला. त्या दोघांनी या पाच ओव्हर्समध्ये 65 धावा कुटल्या.
Virat Kohli brings up back-to-back fifties 🔥#T20WorldCup | #NEDvIND | 📝: https://t.co/9FPx3tOBBe pic.twitter.com/IAUuu33nrZ
— ICC (@ICC) October 27, 2022
विराट टॉप स्कोरर टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली हा भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. विराटनं आतापर्यंत 21 वर्ल्ड कप सामन्यात 989 धावा केल्या आहेत. त्यात तब्बल 12 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे विराट कोहली हाच टी20 वर्ल्ड कपमधला टीम इंडियाचा किंग म्हटलं तर वावगं ठरणार नाही.