धोनीसह चार खेळाडूंना BCCI ने दिला डच्चू, एकाने घेतली होती निवृत्ती

धोनीसह चार खेळाडूंना BCCI ने दिला डच्चू, एकाने घेतली होती निवृत्ती

फक्त धोनीच नाही तर आणखी काही खेळाडूंना BCCIने या यादीतून वगळण्यात आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 16 जानेवारी : बीसीसीआयने गुरुवारी खेळाडूंसोबतचा वार्षिक करार जाहीर केला आहे. यामध्ये 27 खेळाडूंचा समावेश असून धोनीचे नाव यामध्ये नसल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. धोनी आता निवृत्ती घेणार का अशी चर्चा रंगली आहे. मात्र या यादीतून फक्त धोनीच नाही तर आणखी काही खेळाडू या यादीतून वगळण्यात आले आहेत.

नव्या करारातून दिनेश कार्तिक, माजी फलंदाज अंबाती रायडू आणि वेगवान गोलंदाज खलील अहमद यांनाही वगळलं आहे. हे तीनही खेळाडू गेल्यावर्षी ग्रेड सीमध्ये होते. त्यांना एक वर्षाला एक कोटी रुपये दिले जात होते. या तिन्ही खेळाडूंची कामगिरी खराब असल्यानं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. रायडुने वर्ल्ड कप संघात निवड न झाल्यानं निवृत्ती जाहीर केली होती. त्याने पुन्हा युटर्न घेतला आहे.

यावर्षी बीसीसीआयकडून 27 खेळाडूंशी वार्षिक करार करण्यात आला आहे. बीसीसीआयनं या करारात प्रामुख्याने चार गट केले आहेत. ग्रेड A मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वर्षाकाठी सात कोटी रुपये, ग्रेड Aच्या खेळाडूंना पाच कोटी रुपये दिले जातात. त्याचबरोबर ग्रेड B मधील तीन कोटी आणि ग्रेड Cच्या खेळाडूंना एक कोटी रुपये दिले जातात.

कर्णधार कोहली A श्रेणीत सामील

सर्वात उंच ग्रेड असलेल्या Aमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि एकदिवसीय क्रिकेटमधील नंबर वनचा गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंना करारानुसार सात कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

ग्रेड Aमध्ये ऋषभ पंतचा समावेश

बीसीसीआयच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या या करारात ग्रेड Aमध्ये एकूण 11 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत असेलल्या खेळाडूंना दरवर्षी 5 कोटी रुपये दिले जातील. यामध्ये आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी या गोलंदाजांचा तर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, के. एल. राहुल, शिखर धवन आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, ग्रेड बीमध्ये ऋद्धिमान साहा (Wriddhiman Saha), उमेश यादव (Umesh Yadav), यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या आणि मयंक अग्रवाल यांचे नाव तीन कोटींच्या यादीत टाकण्यात आले आहे.

दीपक चाहर आणि नवदीप सैनी पहिल्यांदा झाले करारात सामिल

ग्रेड Cमध्ये आठ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांना वर्षाला 1 कोटी रुपये देण्यात येतात. यात केदार जाधव, मनीष पांडे, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर यांच्याशिवाय दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर आणि वॉशिंग्टन सुंदर यांचे नाव सामिल करण्यात आले आहे.

6 षटकांत पाहिजे होत्या 83 धावा, पठ्ठ्याने 9 चेंडूतच फिरवला सामना; पाहा VIDEO

टीम इंडियासाठी खुशखबर! भारताच्या स्टार गोलंदाजावर लंडनमध्ये झाली यशस्वी सर्जरी

Published by: Suraj Yadav
First published: January 16, 2020, 8:13 PM IST
Tags: BCCI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading