Home /News /sport /

IPL चा फॉरमॅट बदलणार, 2 टीमसाठी 6 शहरं दावेदार! वाचा 5 मोठ्या गोष्टी

IPL चा फॉरमॅट बदलणार, 2 टीमसाठी 6 शहरं दावेदार! वाचा 5 मोठ्या गोष्टी

इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) स्पर्धेचा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यापूर्वीच आयपीएलचा पुढचा सिझन सध्या चर्चेत आहे. कारण या स्पर्धेत या स्पर्धेचा संपूर्ण फॉरमॅट बदलणार आहे.

  मुंबई, 1 सप्टेंबर : इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) स्पर्धेचा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यापूर्वीच आयपीएलचा पुढचा सिझन सध्या चर्चेत आहे. कारण, पुढच्या सिझनपासून ही स्पर्धा पूर्ण बदलणार आहे. IPL 2022 मध्ये 8 नाही तर 10 टीम खेळणार आहेत. दोन नव्या टीमसाठी बीसीसीआयनं एक टेंडर जारी केलंय. त्यामध्ये या टीमची बेस प्राईज देखील निश्चित केली आहे. 6 शहरं या 2 जागेसाठी दावेदार आहेत. नव्या आयपीएल सिझनबाबत 5 मोठ्या गोष्टी पाहूया
  1. आयपीएल 2022 ही स्पर्धा नव्या प्रकारात होणार आहे. सध्याच्या फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा झाली तर एकूण 94 मॅच होतील. त्यामुळे 2011 च्या फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा होईल.  2011 साली देखील आयपीएलमध्ये 10 टीम खेळल्या होत्या. पुढी आयपीएलमध्ये 70 लीग आणि 4 प्ले ऑफ अशा एकूण 74 मॅच होतील.
  2. बीसीसीआयनं IPL 2022 च्या नव्या टिमचे टेंडर जारी केले आहे. एक दावेदार एकाच टीमसाठी टेंडर करु शकेल. या टेंडरसाठीचा फॉर्म 10 लाख रूपयांचा आहे. बीसीसीआय कोणतेही कारण न देता हा फॉर्म फेटाळू शकते.
  3. मीडिया रिपोर्टनुसार नव्या 2 टीमसाठी 6 शहरं शर्यतीमध्ये आहेत. अहमदाबाद आणि लखनौसह कटक आणि गुवाहटी शहरांच्या टीमसाठीही बोली लावली जावू शकते.
  4. बीसीसीआयने एका टीमची बेस प्राईज 2 हजार कोटी रुपये ठेवली आहे. त्यामुळे एका टीमकडून किमान 2 हजार कोटी रूपये बीसीसीआयला मिळणार आहेत. या लिलावातून बीसीसीआय 5 हजार कोटींपर्यंत कमाई करेल असा अंदाज आहे  CPL 2021: अंपायरच्या निर्णयावर नाराज पोलार्डनं केली अजब कृती, VIDEO VIRAL
  5. आजवरच्या आयपीएल इतिहासात सर्वात महाग टीम पुणे वॉरियर्स इंडिया होती. जी 2010 साली 333. 2 मिलियन डॉलरमध्ये खरेदी करण्यात आली होती. तर राजस्थान रॉयल्स सर्वात कमी 67 मिलिअन डॉलरमध्ये खरेदी करण्यात आली होती.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket news, Ipl 2022

  पुढील बातम्या