मुंबई, 22 फेब्रुवारी : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दोघांच्या घटस्फोटाविषयी मागील बऱ्याच महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. सानियाने काही महिन्यांपूर्वी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे शोएब सोबत तिचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर शोएब आणि सानियाच्या जवळच्या मित्राने देखील या दोघांचा घटस्फोट झाला असल्याची माहिती मीडिया सूत्रांना दिली होती. अशातच सानिया शोएबच्या घटस्फोटाला पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमर जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. यावर प्रथमच आयेशाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरच्या शो वर शोएब मलिक सोबतच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक या दोघांनी 12 एप्रिल 2010 रोजी विवाह केला. यादोघांच्या विवाहाची जेवढी चर्चा रंगली त्याच्याहून जास्त चर्चा ही या दोघांच्या घटस्फोटाविषयी होत आहे. अनेक महिन्यांपासून या दोघांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या येत असल्या तरी अद्याप दोघांपैकी एकानेही याबाबत स्पष्टपणे काही सांगितले नाही. परंतु यांच्या घटस्फोटाची बातमी सामोटर येताच काहींनी याचा दोष पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमर हिला लावला. हे ही वाचा : ‘त्याने कोणताही गुन्हा केला नाही’ हरभजन सिंहने के एल राहुलची केली पाठराखण! एक वर्षापूर्वी आयेशा आणि शोएब या दोघांनी एका मासिकासाठी हॉट फोटोशूट केले होते. यादरम्यानच आयेशा आणि शोएब एकमेकांच्या जवळ आल्याचे बोलले जात होते. अशातच आता आयेशाने क्रिकेटर शोएब अख्तरच्या शोमध्ये शोएब मलिक सोबतच्या नात्याबाबत स्पष्टता केली आहे.
शोएबसोबत कथित अफेअरबद्दल आयेशा हिला विचारले ती म्हणाली, “मी कधीही विवाहित किंवा वचनबद्ध पुरुषाकडे आकर्षित होणार नाही. मी कशी आहे याबद्दल बरेच जण जाणून आहेत”. मग ही गोष्ट आली कुठून असा प्रश्न विचारला असता, आयेशाने म्हंटले,“ही कॉंट्रोव्हर्सी आपल्याकडे नाही तर बॉर्डर पार असलेल्या भारतात सुरु होती”. सध्या आयेशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.