मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /टिम साउदीने तोडले 42 वर्षाचे जुने रेकॉर्ड, किवींकडून 5 विकेट घेणार ठरला पहिलाच गोलंदाज

टिम साउदीने तोडले 42 वर्षाचे जुने रेकॉर्ड, किवींकडून 5 विकेट घेणार ठरला पहिलाच गोलंदाज

Tim Southee

Tim Southee

कानपूरमध्ये 42 वर्षांनंतर परदेशी वेगवान गोलंदाज टीम साऊदीने(Tim Southee ) 5 विकेट घेतल्या.

कानपूर, 26 नोव्हेंबर: टीम साऊदीच्या(Tim Southee) शानदार गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत दमदार पुनरागमन केले आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (India vs New Zealand Test Series) सौदीने पहिल्या सत्रात 4 विकेट्स घेत हा पराक्रम केला. मात्र, श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीमुळे टीम इंडियाला 300 धावांचा टप्पा पार करता आला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उपाहारापर्यंत संघाने 8 बाद 339 धावा केल्या आहेत. आर अश्विन 38 धावा करून खेळत आहे. कानपूरमध्ये 42 वर्षांनंतर परदेशी वेगवान गोलंदाज टीम साऊदीने 5 विकेट घेतल्या.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने 4 विकेट्सवर 258 रन्सच्या पुढे खेळायला सुरुवात केली. दिवसाच्या तिसऱ्या षटकात टीम साऊदीने रवींद्र जडेजाला बोल्ड करत संघाला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. जडेजाला त्याच्या 50 धावांच्या धावसंख्येत एकही अधिक धाव करता आली नाही. यानंतर यष्टिरक्षक फलंदाज ऋद्धिमान साहाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याला साऊदीच बाद केले.

अय्यर शतक झळकावून बाद झाला

श्रेयस अय्यरने 171 चेंडूत 105 धावा केल्या. 13 चौकार आणि 2 षटकार मारले. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर टीम साऊदीने त्याला बाद केले. अक्षर पटेलला बाद करत सौदीने आपले ५ विकेट पूर्ण केले. अक्षरला केवळ 3 धावा करता आल्या. कानपूरमध्ये 1979 नंतर किवींकडून परदेशी वेगवान गोलंदाज टीम साऊदीने एका डावात 5 बळी घेतले. यापूर्वी 1979 मध्ये पाकिस्तानच्या सिकंदर बख्त आणि एहतेसामुद्दीन यांनी ही कामगिरी केली होती.

आर अश्विनसोबत उमेश यादव 4 धावांवर खेळत आहे. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी टीम इंडियाच्या सर्व 8 विकेट घेतल्या आहेत. टीम साऊदीशिवाय काईल जेमिसनने 3 विकेट घेतल्या आहेत. किवी संघाचे फिरकीपटू आतापर्यंत प्रभावी ठरलेले नाहीत. संघासाठी 3 फिरकी गोलंदाज खेळत आहेत.

First published:

Tags: New zealand, Test series