मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /मंदिरात गेलेल्या विराट अनुष्काला पाहून अभिनेत्री कंगना रनौत म्हणाली....

मंदिरात गेलेल्या विराट अनुष्काला पाहून अभिनेत्री कंगना रनौत म्हणाली....

मंदिरात गेलेल्या विराट अनुष्काला पाहून अभिनेत्री कंगना रनौत म्हणाली....

मंदिरात गेलेल्या विराट अनुष्काला पाहून अभिनेत्री कंगना रनौत म्हणाली....

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा या दोघांनी आज उज्जेनच्या महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. सध्या त्यांच्या भेटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 4 मार्च : इंदोर येथील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. या पराभवानंतर भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा या दोघांनी आज उज्जेनच्या महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. सध्या त्यांच्या भेटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

विराट कोहलीने शनिवारी पहाटे आपल्या पत्नीसह उज्जेन येथील महाकालेश्वर मंदिरात होणाऱ्या भस्म आरतीला पोहोचला. यावेळी त्याने सोहळ परिधान करून, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून, अंगाला भस्म लावून शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला. विराट अनुष्का यावेळी बराच काळ मंदिरात उपस्थित होते. दोघांनी शंकराच्या पिंडीला अभिषेक घालून जोडीने आरती देखील केली. यापूर्वी देखील अक्षर पटेल आणि के एल राहुल यांनी त्यांच्या पत्नी सोबत या मंदिराला भेट दिली होती.

कोणी देव तर कोणी गुरु, भारतीय क्रिकेटर्स यांच्या पुढे होतात नतमस्तक

विराट अनुष्काच्या मंदिर भेटीच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवत लिहिले, "हे जोडपं सर्वांपुढे एक उत्तम उदाहरण प्रस्थापित करत आहे, महाकाल त्यांना आशीर्वाद देतीलच पण यातून एक प्रकारे सनातनावर उभारलेल्या धर्माचा आणि सभ्यतेचा गौरवही होत आहे. यामुळे काही प्रमाणात मंदिर आणि राज्यातील पर्यटन वाढण्यास देखील मदत होईल.  एकूणच देशाचा स्वाभिमान आणि अर्थव्यवस्था या दोघांनाही मदत होईल".

काही दिवसांपूर्वी  विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी आध्यात्मिक यात्रा करताना बाबा नीम करौली यांच्या आश्रमाला भेट दिली होती.  यावेळी त्यांनी मुलगी वामिका सह प्रवचन श्रवण केले. तसेच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होण्यापूर्वी विराट अनुष्का यांनी  ऋषिकेशमधील स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमाला देखील भेट दिली होती. तेव्हा यादोघांनी तेथे भंडाऱ्याचे आयोजन केले होते.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, Kangana ranaut, Virat kohli, Virat kohli and anushka sharma