जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / आमचा दबाव वाढवू नका, रबाडानं पंजाबच्या टीमला दिला घरचा आहेर

आमचा दबाव वाढवू नका, रबाडानं पंजाबच्या टीमला दिला घरचा आहेर

Kagiso Rabada

Kagiso Rabada

मुंबई, 20 एप्रिल: यंदाच्या आयपीएल हंगामात चांगली सुरुवात केल्यानंतर पंजाब किंग्ज (PBKS) ला त्यांच्या शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामुळे संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरला आहे. आता पंजाब बुधवारी दिल्लीशी भिडणार आहे. तत्पूर्वी, त्यांचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने (Kagiso Rabada) बॅट्समनची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. रबाडा म्हणाला, ‘‘मला वाटते की आम्ही मधल्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी करतो. आम्ही लवकर विकेट गमावल्या होत्या. लिव्हिंगस्टोनने आम्हाला सामन्यात परत आणले. आपण पाहिल्यास, आम्ही जवळजवळ 60/4 वरून 130/4 वर गेलो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 एप्रिल: यंदाच्या आयपीएल हंगामात चांगली सुरुवात केल्यानंतर पंजाब किंग्ज (PBKS) ला त्यांच्या शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामुळे संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरला आहे. आता पंजाब बुधवारी दिल्लीशी भिडणार आहे. तत्पूर्वी, त्यांचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने (Kagiso Rabada) बॅट्समनची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. रबाडा म्हणाला, ‘‘मला वाटते की आम्ही मधल्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी करतो. आम्ही लवकर विकेट गमावल्या होत्या. लिव्हिंगस्टोनने आम्हाला सामन्यात परत आणले. आपण पाहिल्यास, आम्ही जवळजवळ 60/4 वरून 130/4 वर गेलो. त्या काळात आम्ही चांगली फलंदाजी केली. जेव्हा तुम्ही शेवटच्या षटकात चार विकेट गमावता तेव्हा ते कधीही चांगले नसते." आत्तापर्यत सीजनमध्ये पंजाबकडून लिविंगस्टोन आणि धवन व्यतिरिक्त कोणीही चांगली खेळी केलेली नाही. फलंदाजांच्या या अशा कामगिरीमुळे गोलंदाजांवर दबाव पडतो असे मत राबाडाने यावेळी व्यक्त केले. आयपीएल 2022 च्या पहिल्याच सामन्यात पंजाब किंग्जने 200 हून अधिक धावांचा पाठलाग करताना सामना जिंकून हंगामाची सुरुवात केली. मात्र त्यानंतर संघाने मधल्या काळात काही सामने गमावले. यामागचे सर्वात मोठे कारण आहे संघाची फलंदाजी. लिव्हिंगस्टोन आणि धवन यांच्याशिवाय एकही फलंदाज चांगली कामगिरी करत नाही. संघाचा कर्णधार मयंक अग्रवालनेही या मोसमात केवळ 94 धावा केल्या आहेत, मोठ्या किंमतीला विकत घेतलेला शाहरुख खान देखील केवळ 86 धावा करू शकला आहे. गेल्या दोन सामन्यात पराभूत झालेल्या दिल्ली कॅपिटल्सला(Delhi Capitals) कोरोनाचा फटका बसला आहे. दिल्लीचा प्रमुख ऑल राऊंडर मिचेल मार्शला (Mitchell Marsh) कोरोनाची लागण झालीय. तो सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. मार्शच्या अनुपस्थितीमुळे दिल्लीचं संतुलन आणखी बिघडलं आहे. बुधवारी होणाऱ्या सामन्यात दिल्लीसममोर पंजाब किंग्जचं (Punjab Kings) आव्हान आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडिअमवर होणार आहे. ओपनिंगचा प्रश्न सुटला डेव्हिड वॉर्नर (David Warner) टीममध्ये आल्यानं दिल्लीच्या ओपनिंगचा प्रश्न सुटला आहे. वॉर्नर आणि त्याचा सहकारी पृथ्वी शॉ सध्या फॉर्मात आहेत. पण, दिल्लीला चांगल्या फिनिशरची आवश्यकता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात