मुंबई, 2 मार्च : 25 मार्च पासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या 16 व्या सिझनसाठी आता सर्वच संघानी तयारी सुरु केली आहे. अशातच काल मुंबई इंडिअन्सच्या चाहत्यांसाठी जसप्रीत बुमराह बाबत बॅड न्यूज समोर आली होती. बुमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असल्याने तो यंदा आयपीएलला देखील मुकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बुमराहच्या अनुपस्थितीमुळे मुंबई संघाची चिंता वाढली होती. परंतु मुंबई इंडिअन्ससाठी आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मागील वर्षी दुखापतग्रस्त असल्याने आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये खेळू न शकलेला इंग्लंडचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर हा यंदाच्या आयपीएलमध्ये पूर्णवेळ उपलब्ध राहणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डने या बातमीचा दुजोरा दिला असून आर्चरच्या वर्क लोडची जबाबदारी ही इंग्लंडच्या बोर्डावरच असेल. त्यामुळे बुमराह दुखापतीमुळे त्रस्त असला तरी आर्चरमुळे मुंबई संघाची गोलंदाजीची बाजू अधिक भक्कम होईल. ऑल राउंडर शार्दूल ठाकूरने लग्नात घेतला भन्नाट उखाणा, पाहा व्हिडिओ आर्चर एक उत्कृष्ट गोलंदाज असून त्याने आतापर्यंत क्रिकेटचे सर्व फॉरमॅट आणि आयपीएलमध्ये 141 विकेट्स घेतले आहेत. मुंबईने आयपीएल मेगा लिलाव 2022 मध्ये आर्चरला 8 कोटी रुपयांना विकत घेतले होते. दुखापतीमुळे आर्चर 15 व्या हंगामात खेळू शकणार नाही हे मुंबईला माहीत असूनही त्यांनी भविष्याचा विचार करून त्याच्यावर गुंतवणूक केली होती. दीर्घकाळ दुखापतीने त्रस्त असलेल्या आर्चरने यंदा दक्षिण आफ्रिका टी-20 लीगद्वारे दमदार पुनरागमन केले. आर्चरच्या आगमनामुळे मुंबई इंडियन्सचे टेन्शन नक्कीच दूर होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.