जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ऑल राउंडर शार्दूल ठाकूरने लग्नात घेतला भन्नाट उखाणा, पाहा व्हिडिओ

ऑल राउंडर शार्दूल ठाकूरने लग्नात घेतला भन्नाट उखाणा, पाहा व्हिडिओ

ऑल राउंडर शार्दूल ठाकूरने लग्नात घेतला भन्नाट उखाणा

ऑल राउंडर शार्दूल ठाकूरने लग्नात घेतला भन्नाट उखाणा

भारताचा स्टार ऑल राउंडर क्रिकेटर शार्दूल ठाकूर 27 फेब्रुवारी रोजी त्याने मैत्रीण मिताली परुळकर सोबत विवाह केला. सध्या त्याच्या शाही लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अशातच मराठमोळ्या शार्दूल ठाकूरने पत्नी मितालीसाठी घेतलेला भन्नाट उखाण्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 2 मार्च : भारताचा स्टार ऑल राउंडर क्रिकेटर शार्दूल ठाकूर सध्या बराच चर्चेत आहे. 27 फेब्रुवारी रोजी याने मैत्रीण मिताली परुळकर सोबत विवाह केला. सध्या त्याच्या शाही लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर त्याचे चाहते लाईक्सचा वर्षाव करीत आहेत. अशातच मराठमोळ्या शार्दूल ठाकूरने पत्नी मितालीसाठी घेतलेला भन्नाट उखाण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. शार्दूल आणि मिताली यांचे लग्न कर्जत मधील एका आलिशान फार्म हाऊसवर पारपडले. २५ तारखेपासून लग्नाचे अनेक कार्यक्रम याठिकाणी संपन्न झाले. त्यात हळदी, मेहेंदी, पूल पार्टी, डिस्को नाईट, संगीत अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश होता. तर वेळातवेळ काढून कर्णधार रोहित शर्मा त्याची पत्नी रितिका, युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री, श्रेयस अय्यर, अर्जुन तेंडुलकर यांसह अनेक स्टार क्रिकेटर उपस्थित होते.

News18लोकमत
News18लोकमत

लग्नानंतरचे सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर हे नवविवाहित जोडपं शार्दुलच्या घरी पोहोचल. यावेळी शार्दुलने आपल्या क्रिकेटर स्टाईलमध्ये मितालीसाठी एक भन्नाट उखाणा घेतला. गृहप्रवेश करताना शार्दुलने उखाणा घेत म्हंटले, " बॉलिंग टाकतो क्विक, रन पण धावलो क्विक; मिताली आमची सुंदरतेच प्रतीक". हा उखाणा शार्दुलने स्वतः तयार केला होता.

जाहिरात

तर पत्नी मितालीने देखील गृह प्रवेशाच्यावेळी “नावघ्या नावघ्या नाव काय घ्यायचं शार्दूल रावांना शेवटी आहोच म्हणायचं” असा सुंदर उखाणा घेतला. लग्नानंतर शार्दूल ठाकूर हा लवकरच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत दिसणार असल्याची शक्यता आहे. अहमदाबाद येथे झालेल्या चौथ्या सामन्यात शार्दूल ठाकूरला भारतीय संघात घेण्याचा विचार असल्याचे कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात