मुंबई, 01 मार्च: भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवरील दुखापतीचं ग्रहण दूर होण्याचं नाव घेत नाही. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेत बुमराह भारतीय संघात परतणार होता. परंतु अद्याप बुमराह मैदानात उतरण्यासाठी पूर्णपणे सज्ज नसल्यामुळे तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही. मात्र त्याहूनही अधिक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जसप्रीत बुमराह आता त्याच्या दुखापतीमुळे IPL 2023 ला ही मुकणार आहे. मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी ही बॅड न्यूजच म्हणावी लागेल. बुमराह मागील सहा महिन्यांपासून त्याच्या पाठीच्या दुखण्यामुळे संघाबाहेर आहे. अनेकदा तो लवकरच संघात परतेल अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. परंतु त्याची दुखापत आणखीनच बळावत असून त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे तो आशिया कप, टी 20 वर्ल्डकपनंतर आता आयपीएल 2023 मध्ये देखील खेळणार नाहीये. मात्र त्यानंतर होणाऱ्या WTC फायनल आणि वर्ल्ड कापसाठी तो तयार असेल का याबाबत BCCI नं स्पष्ट केलं आहे. अपघातानंतर धमाका करण्यासाठी ऋषभ पंत तयार, सगळ्यात आधी करणार हे काम! बुमराह सारखा अनुभवी वेगवान गोलंदाज भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाचा आहे. तेव्हा वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाकडून खेळण्यासाठी बुमराह फिट होण्याचा प्रयत्न करेल. मात्र त्याचं दुःख वाढतच चाललं आहे त्यामुळे तो अजून सहा महिने तरी भरतोय संघात परतणार नाही अशी माहिती BCCI नं दिली आहे. बुमराह वर्ल्ड कप खेळणार का? ऑकटोबर महिन्यात होणारा One Day World Cup बुमराह खेळू शकेल यावर बोलताना BCCI म्हणालं की, सध्या आम्ही याबद्दल काहीही सांगू शकत नाही. बॅक पेनमधून बुमराह कशाप्रकारे सावरतो यावर सर्व अवलंबून आहे. मात्र क्रिकेट फॅन्स बुमराह लवकरात लवकर संघात परत यावा अशीच अशा करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.