नवी दिल्ली, 5 डिसेंबर: अॅशेस मालिकेला(Ashes 2021 ) 8 डिसेंबरपासून गाबा येथे सुरू होणार आहे. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जो रूट टीम(Joe Root ) इंडियाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ऑस्ट्रेलिविरुद्ध या मालिकेत इंग्लंड टीम इंडियाकडून प्रेरणा घेत खेळणार असल्याचे रुटने म्हटले आहे. तसेच त्याने असे का म्हटले याचे कारणदेखील स्पष्ट केले आहे.
भारताने या वर्षी जानेवारीमध्ये गाबा येथे झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत तीन विकेट्सने विजय नोंदवून मालिका 2-1 ने जिंकली होती. 35 वर्षांतील गाबा येथे ऑस्ट्रेलियाचा हा पहिला पराभव होता.
दरम्यान, अॅशेससंदर्भात कार्यक्रमात जो रुट बोलत होता. ''ज्या प्रकारे भारत आपल्या मजबूत बाजूंवर ठाम राहिला, इंग्लंडही तीच रणनीती अवलंबेल. श्रेय भारताला जाते. संपूर्ण मालिकेत संघ अपवादात्मक होता आणि त्याने अनेक प्रकारे पाहुण्या संघांसमोर उत्तम उदाहरण ठेवले. असे कोडकौतुक रुटने यावेळी गायले.
ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या दोन दिवस अगोदर त्यांची प्लेइंग इलेव्हन घोषित केली आहे. त्यामुळे इंग्लंडला आपली रणनीती आखण्याचा मार्ग सोपा झाला आहे.
अॅशेस मालिका 8 डिसेंबरपासून गब्बा मैदानावर खेळवली जाणार आहे. . हा दिवस-रात्र कसोटी सामना गुलाबी चेंडूने खेळवला जाईल. यानंतर पुढील सामने अॅडलेड, मेलबर्न, सिडनी आणि पर्थ येथे खेळवले जातील.
पहिली कसोटी: 8 -12 डिसेंबर, गब्बा
दुसरी कसोटी - 16 ते 20 डिसेंबर, अॅडलेड ओव्हल
तिसरी कसोटी - 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न
चौथी कसोटी – 5 ते 9 जानेवारी, सिडनी
पाचवी कसोटी - 14 ते 18 जानेवारी, पर्थ
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.