मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ashes 2021: जो रूट बनला इंग्लंडचा सर्वात वाईट कर्णधार, पण...

Ashes 2021: जो रूट बनला इंग्लंडचा सर्वात वाईट कर्णधार, पण...

joe Root

joe Root

अॅशेस मालिकेतील (Ashes 2021) तिसऱ्या कसोटी सामन्यात जो रुटच्या(Joe Root) नेतृत्वाखालील इंग्लंड (England) संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

नवी दिल्ली, 28 डिसेंबर: अॅशेस मालिकेतील (Ashes 2021) तिसऱ्या कसोटी सामन्यात जो रुटच्या(Joe Root) नेतृत्वाखालील इंग्लंड (England) संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटी एक डाव आणि 14 धावांनी जिंकून ऍशेस मालिकाही जिंकली. 2021 मध्ये जो रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने 9 कसोटी सामने गमावले आहेत. तो कर्णधार म्हणून अपयशी ठरला असला तरी फलंदाज म्हणून सर्वाधिक यशस्वी खेळाडू ठरला आहे.

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये 1700 हून अधिक धावा केल्या पण कर्णधार म्हणून तो सपशेल अपयशी ठरला. इंग्लंडच्या संघाने या वर्षात 9 कसोटी सामने गमावले आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही इंग्लंडची सर्वात खराब कामगिरी आहे.

इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) कडून वार्षिक पाउंड 700,000 (रु. 7.22 कोटी) कमावतो, जो विराट कोहलीला मिळणाऱ्या 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मात्र, जगातील सर्वात महागडा कसोटी कर्णधार असलेला रूट इंग्लंडला यश मिळवून देण्यात अपयशी ठरला आहे. या वर्षी भारताने इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभूत केले आहे.

जो रूटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने बांगलादेशच्या लाजिरवाण्या विक्रमाची बरोबरी केली. बांगलादेश संघाने एका कॅलेंडर वर्षात 9 कसोटी सामने गमावले आहेत. इंग्लंडने यापूर्वी 1984, 1986, 1993 आणि 2016 मध्येही आठ कसोटी गमावल्या होत्या.

कर्णधार म्हणून अपयशी ठरली असला तरी जो रुट फलंदाज म्हणून सर्वाधिक यशस्वी ठरला आहे. रूटने यावर्षी 15 कसोटी सामन्यांच्या 29 डावांमध्ये 61 च्या सरासरीने 1708 धावा केल्या. त्याने 6 शतके आणि 4 अर्धशतके केली आहेत. हा विश्वविक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफच्या नावावर आहे ज्याने 2006 मध्ये 11 सामन्यात 1788 धावा केल्या होत्या. त्याच्यापाठोपाठ वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज विव्ह रिचर्ड्सचा क्रमांक लागतो, ज्याने 1976 मध्ये 11 कसोटी सामन्यांमध्ये 1710 धावा केल्या आहेत.

जो रूटला या वर्षात इंग्लंडच्या एकाही फलंदाजाची साथ मिळाली नाही. रुटशिवाय इंग्लंडच्या इतर कोणत्याही फलंदाजाने यावर्षी ६०० धावांचा टप्पा गाठलेला नाही. रॉरी बर्न्स 530 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

First published:

Tags: England, Joe root