मुंबई, 19 डिसेंबर, 2022: 'फिफा वर्ल्ड कप कतार 2022' या फुटबॉल स्पर्धेची सांगता झाली आहे. 1986 नंतर प्रथमच अर्जेंटिनाने फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली आहे. जागतिक इव्हेंटच्या व्ह्युवरशीपबाबत विचार करता टीव्हीपेक्षा जिओ सिनेमा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर भारतीयांनी हा इव्हेंट अधिक पाहिला त्यामुळे जिओ सिनेमाने या क्षेत्रात नवी पहाट आणली आहे. स्पर्धेतील फायनल मॅच बघण्यासाठी 32 दशलक्ष प्रेक्षकांनी भारतातून जिओ सिनेमावर ट्यून इनं केलं होतं.
110 दशलक्षांहून अधिक दर्शकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवरील फिफा संबंधित कंटेट बघितला. त्यामुळे भारत आता फिफा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्वाधिक डिजिटल व्ह्युअरशिप बाजारपेठांपैकी एक बनला आहे. चुरशीची स्पर्धा आणि रोमांचक मॅचेसच्या पार्श्वभूमीवर, फिफा वर्ल्ड कप कतार 2022 स्पर्धेनं भारतामध्ये स्पोर्ट्स18 आणि जिओ सिनेमावर 40 अब्ज मिनिटांचा वॉच टाईम मिळवला आहे. संपूर्ण स्पर्धेच्या काळात जिओ सिनेमा हे आयओएस आणि अँड्रॉईडवर डाउनलोड केलेलं पहिल्या क्रमांकाचं मोफत अॅप ठरलं आहे.
हेही वाचा : Jio Cinema ने मोडला रेकॉर्ड, 110 मिलियन प्रेक्षकांनी लुटला फिफा वर्ल्ड कपचा आनंद
भारतातील स्मार्टफोन्स आणि कनेक्टेड टीव्हीवर फुटबॉल अॅक्शन पाहण्यासाठी ग्राहकांनी दिलेल्या वाढत्या पसंतीला अॅपच्या यशाचं श्रेय जातं. जिओ सिनेमानं युजर्सना या पूर्वी कधीही न पाहिलेला हाईप मोड देऊ केला होता. याशिवाय, लाइव्ह सामन्यादरम्यान चाहत्यांना अनेक अन्य साधारण सुविधा देण्यात आल्या होत्या. यामध्ये मॅचचे मल्टी-कॅम दृश्य, रिअल-टाइम ट्रिव्हिया, आकडेवारी आणि टाईम व्हील यांचा समावेश होता. या सुविधांमुळे एखादा अविस्मरणीय क्षण पुन्हा प्रेक्षकांच्या नजरेसमोर जिवंत होत होता.
जिओ एसटीबी, अॅपल टीव्ही, अॅमेझॉन फायरस्टीक, सोनी, सॅमसंग, एलजी आणि शाओमी यांसारख्या एकाधिक ओईएम आणि सीटीव्ही प्लॅटफॉर्मवर विस्तृत उपलब्धतेमुळे स्पर्धेच्या डिजिटल प्रेक्षकांना खूप सहजता मिळाली. सीटीव्ही प्रेक्षकांनी जिओ सिनेमाद्वारे प्रथमच यूएचडी 4K दर्जाच्या क्वालिटीसह जगातील सर्वांत प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धा पाहिली.
"आम्ही ग्राहकांना फिफा वर्ल्ड कप कतार 2022 स्पर्धेचं जागतिक दर्जाचं सादरीकरण सहज उपलब्ध करून देण्याचं वचन दिलं होतं. ही स्पर्धा, भारताचा प्रत्यक्ष सहभाग नसूनही डिजिटल माध्यमावर सर्वाधिक पाहिली गेलेली जागतिक क्रीडा स्पर्धा ठरली आहे," असं व्हायकॉम18 मधील क्रीडा विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जयराज यांनी सांगितलं.
हेही वाचा : मेस्सीने जगाचं आणि Jio Cinema ने लाखो फुटबॉलप्रेमींचं जिंकलं मन, रचला नवा रेकॉर्ड
‘डिजिटल माध्यमांची शक्ती आणि प्रेक्षक त्यांच्या आवडीचे कार्यक्रम आवर्जून पाहण्याला किती उच्च प्राधान्य देतात हेच यावरून लक्षात येतं. पॅरिस-सेंट जर्मेन टीम मेट्स आणि फिफा वर्ल्ड कप गोल्डन बूट विजेता केलिन मबाप्पे आणि फिफा वर्ल्ड कप गोल्डन बॉल विजेता लिओनेल मेस्सी या सगळ्यांच्या सोबतच जणू हे प्रेक्षक असतात. किंबहुना या प्रेक्षकांना डिजिटल माध्यमातून प्रत्यक्ष तिथं असल्याची अनुभूती मिळते,’ असंही जयराज म्हणाले.
स्पोर्ट्स 18 व जिओ सिनेमावर वेन रुनी, लुईस फिगो, रॉबर्ट पायर्स, गिल्बर्टो सिल्वा आणि सोल कॅम्पबेल या वर्ल्ड कप हिरोंच्या सहभागाचं रोस्टरच जणू प्रेक्षकांना उपलब्ध करून दिलं होतं.
केवळ चाहतेच नाहीत तर जिओ सिनेमा आणि स्पोर्ट्स18 वर फिफासाठी भागीदारी करणाऱ्या ब्रँड्सनीही पूर्वी असं आर्थिक यश कधीच अनुभवलं नव्हतं. ई-कॉमर्स, बँकिंग, वित्तीय सेवा, ऑटो, फॅशन, हॉस्पिटॅलिटी आणि फिनटेकमधील 50 हून अधिक ब्रँड्सनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी जिओ सिनेमाच्या क्षमतेचा फायदा घेतला. लेटेस्ट अपडेट्स, स्कोअर आणि व्हिडिओंसाठी चाहते स्पोर्ट्स18 आणि जिओ सिनेमाचं फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूब फॉलो करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: FIFA, FIFA World Cup