रांची, 19 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरी टी 20 (IND vs NZ 2nd T20I) मॅच आज म्हणजेच, शुक्रवारी रांचीमध्ये होणार आहे. या मॅचची सर्व तयारी झाली आहे. दरम्यान मॅच सुरु होण्याला काही कालावधी शिल्लक असतानाच काही फोटोंनी सोशल मीडियावरुन लक्ष वेधले आहे.
भारत-न्यूझीलंड क्रिकेट सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. तीन वाजल्यापासून लोकांची एंट्री सुरु आहे. दरम्यान, स्टेडियमबाहेर ध्वज, टोपीसह अनेक वस्तूंची विक्री सुरू आहे. यासर्वात एक टोपीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ही टोपी झाडाच्या पानांपासून बनवली असल्याचे पाहायला मिळत आहे.
भारत-न्यूझीलंड क्रिकेट सामन्यापूर्वी झाडाच्या पानांपासून बनवलेल्या टोप्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. काही लोक ही टोपी परिधान करुन स्टेडिअमच्या परिसरात फिरताना दिसत आहेत. त्यामुळे अनेकांना या टोपीसंदर्भात सवाल उपस्थित होत आहेत.
दरम्यान, विक्रेता हेमा मुंडा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. "येथे येण्यामागचा उद्देश म्हणजे आपल्या आदिवासी समाजाची राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरची परंपरा जाणून घेणे हा आहे. असे सांगितले. तसेच, ही टोपी गुंगूच्या पानांपासून बनवली जाते." अशी माहितीदेखील मुंडा यांनी दिली. एका टोपीची किंमत 100 रुपये आहे आणि लोकांना ती खरेदी करताना खूप आनंद होत आहे.
तब्बल 4 वर्षांनी रांचीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच होत आहे. रांचीची मॅच जिंकून या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याच्या उद्देशानं टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jharkhand, New zealand, Ranchi