मुंबई, 27 फेब्रुवारी : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवरील दुखापतीचं ग्रहण दूर होण्याचं नाव घेत नाही. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामान्यापासून बुमराह भारतीय संघात परतणार होता. परंतु अद्याप बुमराह मैदानात उतरण्यासाठी पूर्णपणे सज्ज नसल्यामुळे तो ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही. अशातच आता बुमराह मार्च अखेरीस सुरु होणाऱ्या आयपीएल मधून देखील बाहेर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंबरेच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह सप्टेंबर 2022 भारतीय संघात परतलेला नाही. बॉर्डर गावसकर ट्रॉफीपर्यंत तो बरा होऊन संघात परतेल अशी आशा होती. परंतु त्याची दुखापत पूर्णपणे बरी नसल्याने तो कसोटी मालिकेला देखील मुकला. त्यानंतर आता बुमराह आयपीएलमध्ये खेळताना दिसले असे वाटत असताना चाहत्यांना निराश करणारी बातमी समोर आली आहे. डेव्हिड वॉर्नरला भारताच्या दाक्षिणात्य चित्रपटांची भुरळ; शेअर केला खास व्हिडीओ सूत्रांच्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराहचे आयपीएल 2023 पर्यंत तंदुरुस्त राहणे कठीण आहे. तसेच जूनमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलपर्यंतही तो भारतीय संघाकडून खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. परंतु बुमराह हा भारतीय संघातील अनुभवी खेळाडू असल्याने बीसीसीआय आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी जसप्रीत बुमराहला तंदुरुस्त करण्याचा विचार करत आहे. Shardul Thakur Wedding : शार्दुलच्या लग्नात श्रेयस अय्यरने गायलं गाणं, Video Viral मिळालेल्या माहितीनुसार जसप्रीत बुमराह जर खरंच आयपीएल 2023 मध्ये खेळला नाही तर मात्र मुंबई इंडियन्स संघासह त्याच्या चाहत्यांना देखील मोठ धक्का बसेल. बुमराह हा मुंबई इंडियन्सचा महत्वाचा खेळाडू आहे, तेव्हा बुमराहच्या आयपीएल खेळण्याबाबत अधिकृत माहिती कधी समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.