जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / डेव्हिड वॉर्नरला भारताच्या दाक्षिणात्य चित्रपटांची भुरळ; शेअर केला खास व्हिडीओ

डेव्हिड वॉर्नरला भारताच्या दाक्षिणात्य चित्रपटांची भुरळ; शेअर केला खास व्हिडीओ

डेव्हिड वॉर्नरला भारताच्या दाक्षिणात्य चित्रपटांची भुरळ

डेव्हिड वॉर्नरला भारताच्या दाक्षिणात्य चित्रपटांची भुरळ

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरचे भारतीय चाहत्यांशी देखील खास नातं असून तो नेहमी भारताप्रती आपले प्रेम व्यक्त करीत असतो. अशातच आता वॉर्नरला भारताच्या दाक्षिणात्य चित्रपटांची भुरळ पडली आहे. त्याने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियाचा पुरुष क्रिकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर असून यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत नागपूर आणि दिल्ली येथे झालेल्या सामन्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. 1 मार्च पासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार असून याआधी ऑस्ट्रेलियाचा अनुभवी क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरयाने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. डेव्हिड वॉर्नरला कसोटी मालिकेतील सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे तो सध्या संघाबाहेर पडला आहे. वॉर्नरचे भारतीय चाहत्यांशी देखील खास नातं असून तो नेहमी भारताप्रती आपले प्रेम व्यक्त करीत असतो. तर भारतीय क्रिकेट चाहते देखील त्याला चांगला प्रतिसाद देत असतात. अशातच आता वॉर्नरला भारताच्या दाक्षिणात्य चित्रपटांची भुरळ पडली आहे. लग्नानंतर प्रथमच के एल राहुलने पत्नी अथिया सोबत महाकालेश्वर मंदिराला दिली भेट, पाहा Vide0 वॉर्नरने दाक्षिणात्य चित्रपटाची लोकप्रिय अभिनेता विक्रम याच्या ‘आय’ या चित्रपटातील एक अॅक्शन सिन शेअर केला आहे. ज्यात वॉर्नरने अभिनेता विक्रमच्या जागी स्वतःचा चेहरा लावला. यामाध्यमातून तो दृश्यात दिसणाऱ्या लोकांशी स्वतः दोन हात करत असल्याचे पाहायला मिळते. मजेशीर व्हिडिओ शेअर करत वॉर्नरने त्याच्या चाहत्यांना चित्रपटाचे नाव ओळखा असा प्रश्न देखील केला आहे. या व्हिडिओ वर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

जाहिरात

1 मार्च ते 5 मार्च या दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना इंदोर येथील होळकर स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचं पारडं जड असून ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुखापतीच ग्रहण लागल आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात