जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup Breaking: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का, वर्ल्ड कपमधून रोहितचा हुकमी एक्का 'आऊट'

T20 World Cup Breaking: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का, वर्ल्ड कपमधून रोहितचा हुकमी एक्का 'आऊट'

टीम इंडियाला मोठा धक्का

टीम इंडियाला मोठा धक्का

T20 World Cup Breaking: टी20 वर्ल्ड कपआधी भारतीय संघाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा हुकमी एक्का वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला टी20 वर्ल्ड कपला मुकावं लागणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 सप्टेंबर: टी20 वर्ल्ड कप अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यासाठी भारतीय संघाची जोरदार तयारी सुरु आहे. ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेसोबत टी20 मालिका खेळत आहे. पण याचदरम्यान भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आणि एकूणच टीम इंडियासाठी एक धक्कादायक बातमी आहे. या वर्ल्ड कपमधून रवींद्र जाडेजापाठोपाठ आणखी एक स्टार बॉलर खेळताना दिसणार नाही. तो म्हणजे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि रोदित शर्माचा हुकमी एक्का जसप्रीत बुमरा. मिळालेल्या माहितीनुसार माहितीनुसार दुखापतीमुळे जसप्रीत बुमराला टी20 वर्ल्ड कपला मुकावं लागणार आहे. टीम इंडियासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. तिरुअनंतपूरम टी20 आधी पुन्हा दुखापत जसप्रीत बुमराला पाठीच्या दुखापतीमुळे आशिया कपध्ये खेळता आलं नाही. टीम इंडियाला याचा सर्वात मोठा फटका बसला. कारण आशिया कपमधून भारतीय संघाला सुपर फोर फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत नागपूरमधल्या सामन्यात बुमरानं कमबॅक केलं. त्यानंतर हैदराबादच्या शेवटच्या टी20तही तो खेळला. पण या दोन सामन्यानंतर पुन्हा एकदा बुमराच्या दुखापतीनं उचल खाल्ली. मंगळवारी सराव सत्रादरम्यान बॉलिंग करताना बुमराला दुखापत झाली होती. म्हणूनच रोहित शर्मानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी20त बुमराला न खेळवण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयची मेडिकल टीम बुमराच्या या दुखापतीवर लक्ष ठेऊन होती. पण दुखापतीचं स्वरुप मोठं असल्यानं तो आता वर्ल्ड कपमध्येही खेळताना दिसणार नाही.

जाहिरात

हेही वाचा -  Ind vs SA: सिक्युरिटी तोडून मैदानात घुसला फॅन… पाहा भारत-दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये नेमकं काय घडलं? बुमराच्या जागी कोण? दरम्यान जसप्रीत बुमराच्या जागी कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कोरोना झाल्यामुळे वर्ल्ड कपच्या स्टँड बाय खेळाडूंमध्ये असणाऱ्या मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे दुसरा स्टँड बाय बॉलर दीपक चहरला तिरुअनंतपूरमच्या टी20त संधी मिळालीय त्यात त्यानं दोन विकेट्सही काढल्या. त्यामुळे दीपक चहरचा अंतिम 15 मध्ये समावेश होण्याची जास्त शक्यता आहे. दुसरी बाब अशी की आता ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्ट्यांचा विचार करता मोहम्मद सिराजला देखील ऑस्ट्रेलियाचं तिकीट मिळेल याची शक्यता नाकारता येत नाही.

News18

2022 मध्ये केवळ 5 सामने जसप्रीत बुमराच्या फिटनेस समस्यांमुळे यंदाच्या वर्षात त्यानं फार कमी आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यानं फेब्रुवारीत श्रीलंकेविरुद्ध दोन, ऑगस्टमध्ये इंग्लंडविरुद्ध एक आणि नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दोन सामने असे एकूण 5 टी20 सामने यंदाच्या वर्षात खेळले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात