मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम धोक्यात, दिग्गज खेळाडू पोहोचला जवळ

सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम धोक्यात, दिग्गज खेळाडू पोहोचला जवळ

टीम इंडिया 3 जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध (India vs England) 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.

टीम इंडिया 3 जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध (India vs England) 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.

टीम इंडिया 3 जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध (India vs England) 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.

मुंबई, 31 मे : टीम इंडिया 3 जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध (India vs England) 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यात फास्ट बॉलर जेम्स अंडरसन (James Anderson) सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विश्वविक्रम मोडू शकतो. 10 जुलैला अंडरसन 39 वर्षांचा होणार आहे, पण तो अजूनही सर्वश्रेष्ठ फास्ट बॉलरपैकी एक आहे. 160 टेस्ट मॅचमध्ये त्याने 614 विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडची टीम या मोसमात घरच्या मैदानात एकूण 7 टेस्ट खेळणार आहे. यातल्या दोन टेस्ट न्यूझीलंडविरुद्ध आणि 5 भारताविरुद्ध आहेत. अंडरसन जर या सगळ्या टेस्ट खेळला तर तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल.

सचिन तेंडुलकर त्याच्या करियरमध्ये 200 टेस्ट खेळला, यापैकी 94 मॅच त्याने घरच्या मैदानात म्हणजेच भारतात खेळल्या. घरच्या मैदानात एवढ्या टेस्ट खेळण्याचा हा विश्वविक्रम आहे. जेम्स अंडरसनने इंग्लंडमध्ये 89 टेस्ट खेळल्या आहेत. या मोसमात त्याने जर 7 टेस्ट खेळल्या तर त्याच्या नावावर इंग्लंडमध्ये 96 टेस्ट होतील. ज्यामुळे तो घरच्या मैदानात सर्वाधिक टेस्ट खेळणारा क्रिकेटपटू बनेल.

इंग्लंडकडून सर्वाधिक टेस्ट खेळण्याचं रेकॉर्ड एलिस्टर कूकच्या (Alistair Cook) नावावर आहे. कूकने इंग्लंडसाठी 161 टेस्ट खेळल्या. सर्वाधिक टेस्ट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत शिवनारायण चंद्रपॉल (164), राहुल द्रविड (164) आणि जॅक कॅलिस (166) यांनाही अंडरसन मागे टाकू शकतो.

स्वदेशात 400 विकेट घेणारा अंडरसन दुसरा खेळाडू ठरू शकतो. हा रेकॉर्ड करण्यापासून तो 16 विकेट दूर आहे. इंग्लंडमध्ये अंडरसनने 89 टेस्टमध्ये 384 विकेट घेतल्या. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने 79 मॅचमध्ये 493 विकेट मिळवल्या. अनिल कुंबळेला भारतात 63 मॅच खेळून 350 विकेट तर स्टुअर्ट ब्रॉडला (Stuart Broad) इंग्लंडमध्ये 82 मॅच खेळून 334 विकेट घेण्यात यश आलं.

अंडरसन टेस्ट क्रिकेटमध्ये 600 पेक्षा जास्त विकेट घेणारा एकमेव फास्ट बॉलर आहे. त्याने 160 टेस्टमध्ये 614 विकेट घेतल्या आहेत. या मोसमात अंडरसन भारताचा महान स्पिनर अनिल कुंबळेचा (Anil Kumble) विक्रम मोडू शकतो. कुंबळेने 132 टेस्टमध्ये 619 विकेट घेतल्या आहेत. या विक्रमापासून अंडरसन फक्त 6 विकेट लांब आहे.

First published:

Tags: Cricket, India vs england, James anderson, Sachin tendulkar, Team india