मुंबई, 12 एप्रिल: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (CSK vs RCB) संघात आयपीएल 2022 (IPL 2022) 15 व्या सीझनमधील 22 वा सामना मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट अकादमी स्टेडिअमवर पार पडणार आहे. हा चेन्नई आणि बेंगलोरचा हंगामातील पाचवा सामना आहे. चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यात पराभव स्वीकारला आहे, तर बेंगलोरने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांपैकी 3 सामन्यात विजय आणि 1 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. अशात चेन्नई संघ बेंगलोरविरुद्ध विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न करेल. आयपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच चेन्नईने सुरुवातीचे चारही सामने गमावले आहेत. जडेजाच्या नव्या नेतृत्वात चेन्नईला अद्याप विजयाची नोंद करता आली नाही.दुसरीकडे कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर डुप्लेसिसच्या नेतृत्वात बंगळुरू संघाची यंदाच्या सत्रातील कामगिरी लक्षवेधी ठरत आहे. CSK vs RCB: सीएसकेच्या अडचणींमध्ये वाढ, 14 कोटींचा खेळाडू IPL ला मुकणार चेन्नई आतापर्यंतच्या आयपीएल रेकॉर्डमध्ये बंगळुरू टीमविरुद्ध किंग ठरला आहे. टीमने 29 पैकी 19 सामन्यांत बंगळुरूला धूळ चारली. मात्र, यंदाच्या सत्रामध्ये बंगळुरू संघ वरचढ मानला जात आहे. बंगळुरूने चारपैकी 3 सामन्यांत विजयी पताका फडकावली आहे. हीच विजयी घोडदौड कायम ठेवण्याच्या इराद्याने बंगळुरू मैदानावर उतरणार आहे. आतापर्यंत चेन्नई आणि बंगळुरूचे संघ 28 वेळा आयपीएलमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये चेन्नईने 18 वेळा तर बंगळुरूने 9 वेळा विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित राहिला. आरसीबीने सीएसकेविरुद्ध एका डावात सर्वाधिक 205 आणि सर्वात कमी 70 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, सीएसकेने आरसीबीविरुद्ध जास्तीत जास्त 208 आणि किमान 82 धावा केल्या आहेत. CSK संभाव्य टीम रवींद्र जडेजा कर्णधार), एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा, डेवोन कॉनवे, ड्वेन ब्रावो, क्रिस जॉर्डन, शिवम दुबे, दीपक चाहर, सिमरजीत सिंह, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सैंटनर, एडम मिल्ने, राजवर्धन हंगरगेकर, प्रशांत सोलंकी, महेश तीक्षणा, मुकेश चौधरी, शुभांशु सेनापति, केएम आसिफ, तुषार देशपांडे, सी. हरि निशांत, एन. जगदीशन, के. भगत वर्मा. RCB संभाव्य टीम फाफ डुप्लेसी (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, वानिंदु हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, शाहबाज अहमद, आकाश दीप, अनीश्वर गौतम, जेसन बेहरनड्रॉफ, जोश हेजलवुड, क्षमा मिलिंद, महिलाल लोमरोर, शरफेन रदरफोर्ड, फिन एलेन, कर्ण शर्मा, डेविड विली, लुवनिथ सिसोदिया, सिद्धार्थ कॉल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.