• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • द्रविडची Team Indiaच्या प्रशिक्षकपदी निवड होताच रोहित शर्माची अशी होती Reaction

द्रविडची Team Indiaच्या प्रशिक्षकपदी निवड होताच रोहित शर्माची अशी होती Reaction

rohit sharma

rohit sharma

राहुल द्रविड याची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक (Rahul Dravid Team India Coach) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, नोव्हेंबर: राहुल द्रविड याची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक (Rahul Dravid Team India Coach) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. द्रविडची प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर सर्वस्तरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच, टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यानेदेखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. द्रविड यांच्या निवडीची घोषणा करतेवेळी भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा ३३ वा सामना खेळत होते. या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना द्रविडच्या निवडीविषयी भाष्य केले. रोहित म्हणाला की, “राहुल द्रविड यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याने त्यांना शुभेच्छा. ते नव्या भूमिकेत भारतीय संघात परतल्याने त्यांचे अभिनंदन. ते भारतीय क्रिकेटचे एक दिग्गज शिलेदार आहेत. आम्ही त्यांच्या प्रशिक्षणाखाली खूप चांगले प्रदर्शन करू. असा विश्वास त्याने यावेळी व्यक्त केला. तसेच, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्यांची या पदी नियुक्ती होणार असल्याची आम्हाला कसलीही कल्पना आम्हाला नव्हती. असा खुलासादेखील त्याने यावेळी केला. यापूर्वी, प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर द्रविडने, कॅप्टन पदासंदर्भात संवाद साधला होता. त्यावेळी द्रविडनं त्याची पहिली पसंती रोहित शर्मा (Rohit Sharma) असल्याचं सांगितलं. द्रविडनं रोहितनंतर केएल राहुलचं (KL Rahul) नाव घेतलं. टीम इंडियाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ सध्या सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. द्रविड त्यांची जागा घेईल. न्यूझीलंडविरुद्धच्या भारतात होणाऱ्या सीरिजपासून राहुल द्रविड नवी जबाबदारी सांभाळेल. काल झालेल्या अफगाणिस्तानसोबतच्या सामन्यात भारताने यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पहिला विजय मिळवला.
  Published by:Dhanshri Otari
  First published: