मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, IPL दरम्यान 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मिळणार प्रवेश

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, IPL दरम्यान 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मिळणार प्रवेश

fans

fans

आयपीएलसाठी( IPL 2022) वानखेडे, ब्रेबॉन, डी.वाय पाटील या स्टेडियममध्ये 25 टक्के ऐवजी 50 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवागी देण्यात यावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. अशातच, क्रिकेट प्रेमींसाठी यासंदर्भात दिलासादायक माहिती समोर आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 1 एप्रिल: आयपीएलसाठी( IPL 2022) वानखेडे, ब्रेबॉन, डी.वाय पाटील या स्टेडियममध्ये 25 टक्के ऐवजी 50 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवागी देण्यात यावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. अशातच, क्रिकेट प्रेमींसाठी यासंदर्भात दिलासादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 6 एप्रिलपासून 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे. आयपीएलच्या तिकीट भागीदार बुक माय शोने शुक्रवारी याची पुष्टी केली आहे.पहिल्या काही सामन्यांसाठी ही क्षमता 25 टक्के निश्चित करण्यात आली होती, ती आता वाढवण्यात आली आहे. यंदा आयपीएल महाराष्ट्रात चार मैदानांवर खेळवली जात आहे.

IPL 2022: चेन्नई विरुद्ध लखनऊ सामन्यानंतर अशी आहे पॉईंट टेबलची स्थिती

आयपीएल सुरु होण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने वानखेडे स्टेडियम, ब्रेबोर्न स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम आणि महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम (पुणे) या चार ठिकाणी खेळवण्यात येणाऱ्या आयपील मॅचसाठी केवळ 25 टक्के प्रेक्षकांवा परवानगी देण्यात आली होती.

पुढील काही सामन्यांसाठी तिकीट विक्री सुरू झाली आहे. त्याचबरोबर बीसीसीआयनेही स्टेडियममधील प्रेक्षकांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तो आता 25 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर आणला आहे. देशी-विदेशी प्रेक्षकांना जास्तीत जास्त संख्येने स्टेडियममध्ये येऊन थेट सामन्याचा आनंद घेता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी गुरुवारी महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रातील कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध 2 एप्रिलपासून संपणार आहेत. मास्क घालण्याचीही गरज भासणार नाही. राज्यातील कोरोनाची प्रकरणे जवळपास थांबली आहेत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मास्क घालणे ऐच्छिक असेल. असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

First published:

Tags: Csk, IPL 2021, KKR, Mumbai Indians, Punjab kings, Rajasthan Royals