दुबई, 16 सप्टेंबर : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 (Cricket World Cup 2019) आयसीसीनं आयोजित केलेली सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. आयसीसीनं नुकत्याच प्रसिध्द केलेल्या बातमीत, या वर्ल्ड कपचे थेट प्रसारण एकूण 60 कोटी लोकांनी पाहिले. आश्चर्याची बाब म्हणजे या सगळ्यात भारतीय चाहते आघाडीवर आहेत. हॉटस्टारनं भारत आणि न्यूझीलंड (India And New Zealand) यांच्यात झालेला सेमीफायनलचा सामना तब्बल 2.53 कोटी लोकांनी पाहिला, यात भारतीय चाहते आघाडीवर आहेत. 2015च्या तुलनेतर 38 टक्के चाहत्यांमध्ये वाढ आयसीसीच्या इतिहासतील 2019चा वर्ल्ड कप ही सर्वात मोठी स्पर्धा होती. आयसीसीच्या 25 प्रसारण भागीदारांनी 200हून अधिक क्षेत्रांमध्ये 20 हजारहून अधिक तास वर्ल्ड कप सामन्यांचे थेट प्रसारण केले. दरम्यान 2015च्या तुलनेत 2019मध्ये या संख्येत तब्बल 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आयसीसीनं दिलेल्या माहितीनुसार, या सगळ्या सामन्यांमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना सर्वात जास्त पाहिला गेला. हा सामना 27.30 कोटी लोकांनी टिव्हीवर पाहिला. तर, पाच कोटी लोकांनी हा सामना डिजिटल मंचावर पाहिला. वाचा- धोनीशिवाय चेन्नई सुपरकिंग्ज मैदानात उतरणार? श्रीनिवासन यांच्या वक्तव्यानं चर्चा वर्ल्ड कप पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये वाढ आयसीसी वर्ल्ड कप 2019मध्ये ही स्पर्धात पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. ही वाढ 40 टक्क्यांनी झाली आहे. आयसीसीचे प्रमुख मनु साहनी यांनी दिलेल्या माहितीत, “प्रेक्षकांच्या संख्येत वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे सामन्यांचे थेट प्रसारण. थेट प्रसारण केल्यामुळं जगभरातील लोक थेट सामना पाहू शकतात”, असे सांगितले. वाचा- वाद काही संपेना! LIVE सामन्यात बेन स्टोक्सनं वॉर्नरला घातल्या शिव्या 1.5 कोटी लोकांनी पाहिला अंतिम सामना आश्चर्याची बाब म्हणजे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापेक्षा भारत आणि न्यूझीलंड यांचियीत झालेली सेमीफायनलचा सामना सर्वात जास्त लोकांनी पाहिला. वर्ल्ड कपचा अंतिम सामना 89 लाख लोकांनी पाहिला. आयसीसीचे ब्रॉडकास्ट प्रमुख आरती डबास यांनी, “याआधीच्या तुलनेत आता सर्वात जास्त लोक सामन्यांचे थेट प्रसारण पाहतात. भारतात आणि जगभरात क्रिकेट चाहत्यांची क्रेझ वाढली आहे. त्यामुळं वर्ल्ड कपचे थेट प्रसरण फायद्याचे आहे”, असे सांगितले. वाचा- ‘माझं यश त्यांनी पाहिलंच नाही’, वडिलांच्या मृत्यूनंतर 15 वर्षांनी रडला रोनाल्डो VIDEO: आज दिवसभरात घडाणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज, पाहा झटपट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.