भारताचा युवा क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये? सट्टेबाजांच्या संपर्कात असलेल्यांची BCCI कडून चौकशी

भारताचा युवा क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये? सट्टेबाजांच्या संपर्कात असलेल्यांची BCCI कडून चौकशी

तामिळनाडु प्रीमीयर लीगमध्ये सट्टेबाजांच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून एका क्रिकेटपटूसह प्रशिक्षकाची चौकशी सुरू आहे. टीएनएपीएलमध्ये टीम इंडियातील काही खेळाडू खेळतात.

  • Share this:

बेंगळुरू, 16 सप्टेंबर : तामिळनाडु प्रीमीयर लीगमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोपावरून काही जणांची चौकशी सुरू झाली आहे. यामध्ये एक भारतीय खेळाडू, आयपीएलमध्ये असलेल्या एकाचा आणि रणजी प्रशिक्षकाचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सट्टेबाज आणि मॅच फिक्सर्स संघावर अवैध ताबा घेतला असून फ्रँचाईजीच्या माध्यमातून संघ असा खेळत होते जसं की सट्टेबाजांना त्याचा फायदा व्हावा.

पूर्ण स्पर्धेत असा प्रकार घडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही महत्त्वाच्या व्यक्ती सट्टेबाजांच्या संपर्कात असून त्या व्यक्ती वेगवेगळ्या संघात असल्याचा संशय असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. या प्रकरणात पैशांची देवघेव झाल्याचं मतही व्यक्त करण्यात आलं आहे. याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचंही समजते.

बीसीसीआयचे भ्रष्टाचार विरोधी समितीचे प्रमुख अजित सिंग यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, काही खेळाडूंनी आमच्याशी संपर्क केला असून आम्ही त्यांच्याशी ज्यांनी संपर्क केला ते तपासत आहे. यात काही मेसेज व्हॉटस्अॅपवर आले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

आतापर्यंत अनेकदा लहान स्पर्धांमध्ये अशा केस समोर आल्या आहेत. पण पहिल्यांदाच बीसीसीआयकडून मान्याता दिलेल्या स्पर्धेत असा प्रकार समोर आला आहे. टीएलपीएलमध्ये 8 संघ आहेत. यामध्ये भारतीय संघातील आर अश्विन, मुरली विजय, विजय शंकर, दिनेश कार्तिक, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडूही खेळतात.

टीपीएलमध्ये मॅच फिक्सिंगसाठी प्रशिक्षकाला एका सट्टेबाजानं हिऱ्यांचा सेट दिला. त्याआधी प्रशिक्षकानं 25 लाख रुपयांचा सौदा ठरण्यापूर्वी एक एसयुव्ही कार मागितली होती अशी माहिती सूत्रांनी दिली.

सट्टेबाजांच्या सांगण्यावरून प्रशिक्षकांनी संघातील खेळाडूंना किती धावा करायच्या याच्या सूचना दिल्याचंही भ्रष्टाचार विरोधी समितीने म्हटलं आहे.

मॅच फिक्सिंग प्रकरणात युवा खेळाडू असल्याची धक्कादायक माहिती एसीयुनं दिली आहे. या खेळाडूची शिफारस एका दिग्गज क्रिकेटपटूनं केली होती. तसेच त्याच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक मदतही संघ मालकांनी त्याला केली होती अशी माहिती समजते. अद्याप कोणाचीही नावे समोर आलेली नाहीत.

VIDEO: तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं, PUBGमुळे बडबडतो 'पुढं हेडशॉट मारतो मी'

Published by: Suraj Yadav
First published: September 16, 2019, 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading