मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND VS NZ : कॅप्टन रोहित गोंधळला! टॉस जिंकल्यानंतर काय करायचे हेच विसरला, पहा व्हिडीओ

IND VS NZ : कॅप्टन रोहित गोंधळला! टॉस जिंकल्यानंतर काय करायचे हेच विसरला, पहा व्हिडीओ

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यापूर्वी अर्धातास नाणेफेक झाली, परंतु यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुरता गोंधळाला. टॉस जिंकल्यानंतर नेमके काय करावे हेच त्याला सुचेनासे झाले होते. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 जानेवारी : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. आज न्यूझीलंड विरुद्ध मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे पारपडणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता आज होणारा दुसरा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असणार असून यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सामन्यापूर्वी अर्धातास नाणेफेक झाली, परंतु यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुरता गोंधळाला. टॉस जिंकल्यानंतर नेमके काय करावे हेच त्याला सुचेनासे झाले होते. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा  : IND VS NZ : भारताने नाणेफेक जिंकली! या खेळाडूंचा टिम इंडियाच्या प्लेयिंग 11 मध्ये समावेश

सामन्यापूर्वी दुपारी 1 वाजता भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये टॉस करण्यात आला. यावेळी रोहित शर्मा, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम, सामनाधिकारी जवागल श्रीनाथ आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री उपस्थित होते. यावेळी रोहित शर्माने टॉस जिंकला आणि रवी शास्त्रीने त्याला विचारले की तो काय निवडणार?  यावर रोहित शर्मा काही काळ गोंधळला. त्याने दीर्घ पॉझ घेतला आणि डोके खाजवले आणि शेवटी प्रथम गोलंदाजी करणार असे सांगितले.   रोहितच्या या वागण्याने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम आणि सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांच्यात एकाच हशा पिकला.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Ravi shastri, Rohit sharma