मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

महान बॅट्समन ब्रायन लारा पुन्हा क्रिकेटच्या मैदानात दिसणार! 'या' टीमच्या हेड कोचपदी

महान बॅट्समन ब्रायन लारा पुन्हा क्रिकेटच्या मैदानात दिसणार! 'या' टीमच्या हेड कोचपदी

इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी सनरायजर्स हैदराबादने 2023 च्या सीझनमध्ये हेड कोच म्हणून ब्रायन लाराची नियुक्ती केली.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी सनरायजर्स हैदराबादने 2023 च्या सीझनमध्ये हेड कोच म्हणून ब्रायन लाराची नियुक्ती केली.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी सनरायजर्स हैदराबादने 2023 च्या सीझनमध्ये हेड कोच म्हणून ब्रायन लाराची नियुक्ती केली.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

हैदराबाद, 3 सप्टेंबर : क्रिकेट (Cricket) विश्वातील दिग्गज बॉलर्सना एकेकाळी आपल्या जबरदस्त बॅटिंगने घाम फोडणारा वेस्ट इंडिजचा (West Indies) महान बॅट्समन ब्रायन लारा (Brian Lara) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या (IPL) पुढच्या सीझनमध्ये लारा ‘डग आउट एरिया’मध्ये दिसेल. आयपीएलमधल्या सनरायजर्स हैदराबाद (SRH) या टीमने त्याला हेड कोच बनवण्याचा निर्णय घेतलाय. ‘टाइम्स नाऊ’ने याबाबत वृत्त दिलंय.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी सनरायजर्स हैदराबादने 2023 च्या सीझनमध्ये हेड कोच म्हणून ब्रायन लाराची नियुक्ती केली. या टीमचा मागच्या सीझनमध्ये म्हणजेच 2022 मध्ये लारा बॅटिंग कोच आणि धोरणात्मक सल्लागार होता. तेव्हा टॉम मूडी (Tom Moody) हा हेड कोच होता. आता लारा येणाऱ्या आयपीएल सीजनमध्ये टॉम मूडीची जागा घेईल. याबाबत सनरायजर्स हैदराबादने ट्विटरवर माहिती देत लाराच्या नियुक्तीची घोषणा केली आणि मूडीचे त्याने फ्रँचायझीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले.

‘क्रिकेटिंग दिग्गज ब्रायन लारा आगामी आयपीएल सीझनसाठी आमचे हेड कोच असतील. तर, आम्ही टॉमचे त्याने सनरायजर्स हैदराबाद टीमसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानतो. गेल्या अनेक वर्षांचा हा खूप आनंददायी प्रवास होता, आणि आम्ही त्याला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो,’ असं या टीमने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

वाचा - विनोद कांबळीची अडचण दूर, एक लाख पगाराच्या ऑफर लेटरसह कंपनीचे चेअरमन थेट घरी

टॉम मूडी हा 2013 ते 2019 या कालावधीत हैदराबादचा कोच होता. 2016 मध्ये सनरायजर्स हैदराबादने आयपीएलचं विजेतेपद मूडी कोच असतानाच जिंकले होतं. मात्र, 2019 चा वर्ल्डकप विजेता असणाऱ्या इंग्लंड टीमचा कोच ट्रेवर बेलिस याची हैदराबाद टीमचा कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हा 2020 मध्ये मूडी हैदराबादपासून वेगळा झाला. त्यातच 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून क्वालिफायर 2 मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर हैदराबाद टीम स्पर्धेत तिसऱ्या स्थानी राहिली, त्यानंतरही बेलिस यांना कोच म्हणून कायम ठेवण्यात आले. त्यानंतर मूडी क्रिकेट संचालक म्हणून हैदराबाद संघासोबत पुन्हा जोडला गेला. परंतु 2021 मध्ये संघाने 11 मॅचपैकी फक्त तीन मॅच जिंकल्या, व त्याचा परिणाम म्हणून बेलिस याला कोच पदावरुन हटवण्यात आले. त्यानंतर मूडीने पुन्हा कोचची भूमिका स्वीकारली.

परंतु, 2022 मध्ये या टीमकडे निकोलस पूरन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, एडन मार्करम, ग्लेन फिलिप्स, शशांक सिंग, केन विल्यमसन, उमरान मलिक आणि भुवनेश्वर कुमार यासारखे खेळाडू असूनही ही टीम प्लेऑफमध्ये सुद्धा प्रवेश करू शकली नाही. त्यामुळे 2016 नंतर आयपीएल स्पर्धा जिंकण्याची या टीमची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. आता ब्रायन लारा याला टीमचा हेड कोच केल्यामुळे ही प्रतीक्षा संपणार का? हे येणाऱ्या आयपीएल सीझनमध्ये कळेल.

First published:

Tags: Cricket news, Ipl 2022