जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Auction : एका तासात बदलला घरातला माहोल, पहिले छप्पर फाड कमाई आणि नंतर...

IPL Auction : एका तासात बदलला घरातला माहोल, पहिले छप्पर फाड कमाई आणि नंतर...

IPL Auction : एका तासात बदलला घरातला माहोल, पहिले छप्पर फाड कमाई आणि नंतर...

IPL Auction आयपीएल 2023 साठीचा लिलाव आज कोच्चीमध्ये पार पडला. या लिलावात आयपीएल इतिहासातली सगळ्यात मोठी बोली लागली.

  • -MIN READ Kochi,Ernakulam,Kerala
  • Last Updated :

कोच्ची, 23 डिसेंबर : आयपीएल 2023 साठीचा लिलाव आज कोच्चीमध्ये पार पडला. या लिलावात आयपीएल इतिहासातली सगळ्यात मोठी बोली लागली. इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करन याला पंजाब किंग्सने तब्बल 18.50 कोटी रुपयांना विकत घेतलं. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन याच्यावर मुंबईने 17.50 कोटी आणि बेन स्टोक्सवर सीएसकेने 16.25 कोटी रुपये खर्च केले. वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनला लखनऊ सुपर जाएंट्सने तब्बल 16 कोटी रुपये देऊन विकत घेतलं. सॅम करन हा आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. सॅम करनवर सगळ्यात पहिली बोली मुंबई इंडियन्सने लावली. यानंतर आरसीबी, राजस्थान, सीएसके, पंजाब, यांच्यातही करनला विकत घेण्यासाठी स्पर्धा सुरू झाली, अखेर यामध्ये पंजाबला यश आलं. एकीकेड सॅम करन याच्यावर आयपीएल इतिहासातली सगळ्यात मोठी बोली लागली असली तरी करन कुटुंबात मात्र कहीं खुशी कहीं गम अशीच परिस्थिती आहे. कारण सॅम करन याचा भाऊ टॉम करन लिलावात अनसोल्ड राहिला. कोणत्याच टीमने टॉम करनला विकत घेतलं नाही. टॉम करनही सॅम करनप्रमाणेच ऑलराऊंडर आहे. सॅम करनने त्याची बेस प्राईज 75 लाख एवढी ठेवली होती. IPL Auction : मुंबईचा सुरूवातीलाच धमाका, ग्रीनवर ओतला पैसा, रोहित-सचिनसारखीच आहे स्टोरी या आयपीएलमधले महागडे खेळाडू सॅम करन 18.50 कोटी, पंजाब किंग्स कॅमरून ग्रीन 17.50 कोटी, मुंबई इंडियन्स बेन स्टोक्स 16.25 कोटी, सीएसके निकोलस पूरन 16 कोटी, लखनऊ हॅरी ब्रुक, 13.25 कोटी, हैदराबाद IPL Auction 2023 Live : आयपीएल लिलावात खेळाडूंवर पैशांचा वर्षाव, हे प्लेयर्स झाले करोडपती

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात