कोची, 23 डिसेंबर : आयपीएल 2023 च्या लिलावात सुरूवातीलाच टीमनी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला आहे. आयपीएल लिलावाच्या इतिहासात इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करन सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे. पंजाब किंग्सने करनसाठी 18.50 कोटी रुपये मोजले. तर कॅमरून ग्रीन 17.50 कोटी रुपयांना मुंबईच्या ताफ्यात सामील झाला आहे. बेन स्टोक्सला सीएसकेने 16.25 कोटी रुपयांना आणि हॅरी ब्रुकला हैदराबादने 13.25 रुपयांना विकत घेतलं.
कॅमरून ग्रीनची ही पहिलीच आयपीएल असणार आहे. टी-20 मध्ये ग्रीनने ऑस्ट्रेलियाकडून 8 सामने खेळले, यात त्याने 173.75 च्या स्ट्राईक रेटने 139 रन केले, तर 7 इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या आहेत.
IPL Auction 2023 Live : आयपीएल लिलावात खेळाडूंवर पैशांचा वर्षाव, हे प्लेयर्स झाले करोडपती
सप्टेंबर महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातर कॅमरून ग्रीन चर्चेत आला. टी-20 वर्ल्ड कपआधीच्या आधी झालेल्या या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर सारख्या सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली होती. वॉर्नरच्या विश्रांतीमुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने कॅमरून ग्रीनला ओपनिंगला पाठवण्याचा निर्णय घेतला.
भारताविरुद्धच्या पहिल्याच टी-20 मध्ये ओपनिंगला खेळताना ग्रीनने 30 बॉलमध्ये 61 रन केल्या, तसंच त्याला एक विकेटही मिळाली. तर तिसऱ्या टी-20 मध्ये त्याने 21 बॉलमध्ये 52 रनची वादळी खेळी केली. कॅमरून ग्रीनची स्टोरीही सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मासारखीच आहे. ग्रीन हा सचिन आणि रोहितप्रमाणेच सुरूवातीला ओपनर नव्हता, पण त्याला अचानक ओपनिंगला पाठवण्यात आलं आणि या संधीचं त्याने सोनं केलं. आता ग्रीन सचिन आणि रोहितप्रमाणेच मुंबईकडून खेळणार आहे.
कॅमरून ग्रीन ऑस्ट्रेलियाच्या टी-20 टीममध्ये नव्हता, पण जॉश इंग्लिसला दुखापत झाल्यामुळे ग्रीनची शेवटच्या क्षणी ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये निवड झाली. वर्ल्ड कपमध्ये ग्रीनला खेळण्याची संधी मिळाली, पण त्याला यात फारसं यश आलं नाही. ऑस्ट्रेलियाची टीमही टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या राऊंडलाच बाहेर पडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.