मुंबई,23 डिसेंबर : कोच्चीमध्ये आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव थोड्याच वेळात सुरू होणार आहे. दरम्यान, त्याआधी आयपीएलच्या डिजिटल ब्रॉडकास्टर असलेल्या जिओ सिनेमाच्या एक्सपर्ट पॅनेलने मॉक ऑक्शन केलं. यामध्ये कॅमरून ग्रीन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पॅनेलमध्ये सनरायजर्स हैदराबादचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या स्कॉट स्टायरिसने त्याला 20 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं.
जिओ सिनेमासाठी मिनी लिलावात आय़पीएलमध्ये खेळलेल्या सुरेश रैना, ख्रिस गेल, एबी डिव्हीलियर्स, रॉबिन उथप्पा, अनिल कुंबळे, आरपी सिंह, इयॉन मॉर्नग आणि स्कॉट स्टायरिस या माजी क्रिकेटपटूंचे एक्सपर्ट पॅनेल आहे. लिलावाच्या आदल्या दिवशी या तज्ज्ञांनी जिओ सिनेमाने आयोजित केलेल्या मॉक ऑक्शनमध्ये भाग घेतला. त्यांनी प्रत्येक संघाचे प्रतिनिधित्व केले.
इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटर आणि टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला सॅम करन दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला या मॉक ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्जचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या सुरेश रैनाने खरेदी केलं. त्यासाठी 19.5 कोटी रुपयांची बोली लागली. चेन्नईकडे प्रत्यक्षात 20.45 कोटी रुपये शिल्लक आहेत.
बेन स्टोक्सला खरेदी करण्यासाठी अनेक संघात मोठी स्पर्धा दिसण्याची शक्यता आहे. मॉक ऑक्शनमध्येही बेन स्टोक्सला खरेदी करण्यासाठी चढाओढ दिसून आली. पाच संघांनी बेन स्टोक्सला आपल्याकडे घेण्यासाठी बोली लावली. यात शेवटी पंजाब किंग्जचं प्रतिनिधित्व करणाऱ्या इयॉन मॉर्गनने 19 कोटी रुपयात त्याला घेतलं.
हेही वाचा : IPL 2023: आयपीएल आणखी रंगतदार होणार, नव्या हंगामात इम्पॅक्ट प्लेअरचा नवा नियम लागू
मुंबई इंडियन्ससाठी अनिल कुंबळेने ओडियन स्मिथ आणि सिकंदर रजा याला खरेदी केलं. स्मिथला 8.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं. तर सिकंदर रजाला 7 कोटी रुपयात खरेदी करण्यात आलं. भारतीय खेळाडूंमध्ये मयंक अग्रवालसाठी सर्वात मोठी बोली लावली. त्याला हैदराबाद सनरायजर्सने मॉक ऑक्शनमध्ये 6.5 कोटी रुपयांत घेतलं तर लखनऊने शिवम मावीला 5.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2023, IPL auction, Sports