वनडे आणि टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी क्विंटन डिकॉकने नुकाताच टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. टेस्ट क्रिकेट खेळत नसल्यामुळे डिकॉक आयपीएलचा संपूर्ण मोसम खेळण्यासाठी उपलब्ध आहे. मुंबईकडून खेळण्याआधी क्विंटन डिकॉक आरसीबीकडे होता, पण आरसीबीने 2018 साली 2.8 कोटी रुपयांमध्ये क्विंटनला मुंबई इंडियन्सना देऊन टाकलं. IPL Auction 2022 : गुजरातने खरेदी केला पहिला खेळाडू, नेहारानं निवडला जुना सहकारी 2019 सालच्या मोसमात त्याने 529 रन आणि 2020 साली 503 रन केले. क्विंटन डिकॉकच्या या कामगिरीमुळे मुंबईने हे दोन्ही मोसम आयपीएल ट्रॉफी पटकावली. 2021 च्या आयपीएलमध्ये मात्र डिकॉकला सूर गवसला नाही, याचा फटका मुंबईलाही बसला. आयपीएलमध्ये सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईला मागच्या मोसमात प्ले-ऑफमध्ये स्थान मिळालं नाही.The first of our auction journey! 👊 Welcome to the Giants, QuinTON de Kock! 😎#TATAIPLAuction #IPLAuction #LucknowSuperGiants pic.twitter.com/MzCRIY65kc
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) February 12, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, Quinton de kock