बँगलोर, 12 फेब्रुवारी : आयपीएल 2022 च्या लिलावात भारताचा विकेट कीपर दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik) पहिल्या सिझनपासूनची इच्छा पुन्हा एकदा अपूर्ण राहिली आहे. कार्तिक चेन्नईचा आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) कडून खेळण्याची कार्तिकची इच्छा होती. यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) कार्तिकची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी चेन्नईनं जोरदार प्रयत्न केले. पण, अखेर रॉयस चॅलेंजर्स बंगळुरूनं (RCB) कार्तिकला खरेदी केले आहे. आरसीबीने कार्तिकला 5 कोटी 50 लाखांना विकत घेतलं आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमापर्यंत कार्तिक कोलकात्याच्या टीमसोबत होता, पण लिलावाआधी केकेआरने कार्तिकला रिलीज केलं. आयपीएल 2020 पर्यंत कार्तिक केकेआरचा कर्णधार होता, पण अर्धी आयपीएल संपल्यानंतर केकेआरने कार्तिककडून कॅप्टन्सी काढून घेतली आणि इयन मॉर्गनला ही जबाबदारी दिली.
Karthik to don red and gold for @RCBTweets 👌😎#TATAIPLAuction @TataCompanies pic.twitter.com/TaVjv8j8nH
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
दुसरीकडे आयपीएलचा लिलाव सुरू व्हायच्या आधीच कार्तिकने आयपीएलच्या तयारीला सुरुवात केली आहे. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) त्याचा मित्र आणि मार्गदर्शक अभिषेक नायरच्या (Abhishek Nayar) मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये घाम गाळत आहे. IPL Auction 2022 : एकमेकांचा चेहरा न बघणारे खेळाडू पुन्हा एकत्र खेळणार कार्तिक 2007 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय टीमचा भाग आहे. टी-20 मध्ये फिनिशरची भूमिका निभावण्यासाठी आपण खेळामध्ये थोडी सुधारणा करत आहोत, तसंच पुढची 4 वर्ष आपल्याला खेळायचं असल्याचं कार्तिकने सांगितलं. कार्तिकने आतापर्यंत 6 टीमकडून आयपीएल खेळली आहे, पण त्याचं स्वत:चं शहर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळण्याची संधी कार्तिकला मिळाली नाही.