नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी: बांगलादेशचा (Bangladesh) माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनवर (Shakib al Hasan) आयपीलएच्या लिलावात (IPL 2021 Auction) मध्ये सर्वांत जास्त नजरा लागून राहिल्या होत्या. हा गुणी खेळाडू कोणाच्या संघात जाणार आणि त्याच्यावर कोण सर्वाधिक बोली लावणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. शाकिबवर मोठी बोली लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यासाठी कोलकाता नाइटरायडर्स (KKR) म्हणजे शाहरुख खानचा संघ (shah rukh Khan) आणि पंजाबचा (Kings XI Punjab) म्हणजे प्रीती झिंटाचा (Preity Zinta) संघ यांच्यात जोरदार चुरस होती.
वाचा - IPL Auction 2021 Live : गंभीरचा सल्ला धोनीनं मानला! ‘या’ ऑलराऊंडरला केलं खरेदी
KKR आणि Kings XI Punjab या दोन्ही संघांना चांगल्या ऑलराउंडरची गरज आहे. शाकिब ही गरज उत्तम प्रकारे पूर्ण करू शकतो. त्यामुळेच या दोन संघांचा त्याच्यावर डोळा होता. प्रीती झिंटा आणि शाहरुख यांची या खेळाडूवरून लिलावाच्या टेबलावर चुरस दिसली. दोन्ही टीम्सनी या खेळाडूवर बोली लावली. 2 कोटींची बेस प्राइस शाकिबवर लागलेली होती. शेवटी KKR ने 3.20 कोटी बोली लावत पुन्हा एकदा खेळाडू टिकवला. शाहरुख खानच्या टीमने अखेर प्रीती झिंटाच्या टीमवर वरचढ बोली लावत आपला खेळाडू आपल्या तंबूत टिकवून ठेवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Ipl 2021 auction, KKR, Kxip, Preity zinta, Shah Rukh Khan