मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Auction 2021 Live : गंभीरचा सल्ला धोनीनं मानला! ‘या’ ऑलराऊंडरला केलं खरेदी

IPL Auction 2021 Live : गंभीरचा सल्ला धोनीनं मानला! ‘या’ ऑलराऊंडरला केलं खरेदी

IPL 2021 Auction Live Updates: मॅक्सवेलला खरेदी करण्यास अपयश मिळाल्यानंतर चेन्नईनं इंग्लंडचा ऑलराऊंडर मोईन अलीसाठी (Moeen Ali) जोरदार संघर्ष केला. पंजाब किंग्ज सोबत त्यांची जोरदार स्पर्धा रंगली होती. अखेर धोनीच्या टीमनं मोईन अलीला 7 कोटींना खरेदी केलं.

पुढे वाचा ...

  चेन्नई, 18 फेब्रुवारी : गेल्या वर्षीचं अपयश विसरुन नव्या जोमानं चेन्नई सुपर किंग्स (CSK) यावर्षीच्या आयपीएलमध्ये उतरलं आहे. सीएकेनं सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेलसाठी जोरदार प्रयत्न केला. मॅक्सवेलसाठी CSK नं तब्बल 14 कोटींची बोली लावली होती. अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं त्याच्याही पेक्षा जास्त बोली लावत 14 कोटी 25 लाखांना खरेदी केलं.

  मोईन अलीला केलं खरेदी !

  मॅक्सवेलला खरेदी करण्यास अपयश मिळाल्यानंतर चेन्नईनं इंग्लंडचा ऑलराऊंडर मोईन अलीसाठी (Moeen Ali) जोरदार संघर्ष केला. पंजाब किंग्ज सोबत त्यांची जोरदार स्पर्धा रंगली होती. अखेर धोनीच्या टीमनं मोईन अलीला 7 कोटींना खरेदी केलं.

  गौतम गंभीरनं दिला होता सल्ला!

  विशेष म्हणजे सीएसकेनं त्यांच्याकडं शिल्लक असलेल्या एकमेव विदेशी खेळाडूच्या जागेसाठी मोईन अलीला खरेदी करावी असा सल्ला भारताचा माजी ओपनर गौतम गंभीरनं दिला होता.

  IPL Auction 2021 : धडाकेबाज ग्लेन मॅक्सवेलसाठी धोनी आणि कोहलीच्या टीममध्ये चुरस, वाचा अखेर कोण जिंकलं? 

  चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी ऑफ स्पिनरला नेहमी प्राधान्य देतो. त्यामुळे त्यानं मोईन अलीला खरेदी केलं तर त्याच्या अनेक अडचणी कमी होतील,’ असं मत गंभीरनं व्यक्त केलं आहे. इंग्लंडचा हा स्पिनर हरभजनची जागा भरुन काढेल, असा विश्वास गंभीरनं व्यक्त केला होतं.

  काय म्हणाला होता गंभीर?

  “ सीएसकेकडं सध्या इम्रान ताहीर आणि कर्ण शर्मा हे दोन लेगस्पिनर आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडं डाव्या हातानं बॉलिंग आणि चांगली बॅटींग करु शकेल असा स्पिनर (मिचेल स्टॅनर) देखील आहे. आता टीमला एका ऑफ स्पिनरची आवश्यकता आहे. जो प्रतिस्पर्धी टीमच्या उजव्या हाताच्या फलंदाजांच्या विरुद्ध उपयुक्त ठरेल.

  IPL Auction 2021 Live Update

  धोनीच्या टीममध्ये नेहमीच ऑफ स्पिनरला खास स्थान राहिले आहे. यापूर्वी आर. अश्विन आणि हरभजन सिंग होते. आता त्यांना नव्या बॉलनं बॉलिंग करु शकणाऱ्या स्पिनरची गरज आहे. मोईन अलीमध्ये ही क्षमता आहे, ’’ असं गंभीरने सांगितले होते.

  मोईन अलीला खरेदी करुन धोनीनं आपला जुना सहकारी गौतम गंभीरचा सल्ला मानला आहे.

  First published:
  top videos

   Tags: IPL 2021, Ipl 2021 auction, Moin ali