मुंबई, 12 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 16 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पारपडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्लीवर 1 विकेट्सने विजय मिळवून दिल्लीचा त्यांच्याच होम ग्राउंडवर पराभव केला. यासह मुंबईने आयपीएल 2023 मध्ये त्यांचे विजयाचे खाते उघडले. या रोमांचक विजयानंतर रोहित शर्माने पत्नी रितिका हिला व्हिडिओ कॉल केला, याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई आणि आरसीबी विरुद्धचे दोन सामने हरल्यानंतर काल दिल्ली विरुद्धच्या सामन्यात रोमांचक विजय मिळवला. मुंबई इंडियन्स ने 11 एप्रिल रोजी दिल्ली विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 20 वी ओव्हर पूर्ण होण्यापूर्वी मुंबईने दिल्लीचाय 10 विकेट्स घेऊन त्यांना 172 धावांवर रोखले. त्यानंतर मुंबईच्या संघाने दिल्लीने विजयासाठी दिलेले आव्हान 1 विकेट राखून पूर्ण केले. यात मुंबईकडून रोहित शर्माने सर्वोत्तम धाव संख्या करून अर्धशतक ठोकले.
रोमांचक सामन्यात विजय मिळवल्यानंतर रोहित शर्मा ला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. यानंतर रोहित शर्माने मैदानावरून पत्नी रितिका हिला व्हिडिओ कॉल केला. रितिकाने त्याचे आणि संपूर्ण टीमचे कौतुक केले. मुंबई इंडियन्सने रोहित आणि रितिका यांच्यातील संवादाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते यावर लाईक्सचा वर्षाव करीत आहेत.