मुंबई, 11 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये आज दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात मुंबईचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याला फिल्डिंग करताना दुखापत झाली. सूर्याच्या दुखापतीमुळे मुंबईच टेन्शन अधिक वाढलं असून चाहते सूर्यासाठी प्रार्थना करीत आहेत. मुंबई इंडियन्स आज आयपीएल 2023 मध्ये त्यांचं विजयाचं खात उघडण्यासाठी मैदानावर उतरली आहे. सामन्याच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या संघाने गोलंदाजी करताना दिल्लीच्या 10 विकेट्स घेऊन त्यांना 172 धावांवर रोखले. परंतु गोलंदाजीत चांगली कामगिरी केलेल्या मुंबईच्या संघा मगच दुखापतीच ग्रहण सुटण्याचं नाव घेत नाही.
मुंबईचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव हा दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मैदानावर फिल्डिंग करत होता. यावेळी दिल्लीकडून फलंदाजी करत असलेल्या अक्षर पटेलच्या बॅटमधून निघालेला शॉट पडण्याच्या प्रयत्नात तो बॉल थेट सूर्याच्या डोळ्याला लागला. दुखापतीनंतर सूर्यकुमार मैदानात वेदनेने कळवळत होता. यानंतर वैद्यकीय पथकाने त्याला मैदानाबाहेर उपचारांसाठी नेले. सूर्याच्या दुखापतीने फोटो सध्या सोशल मिडीआयावर व्हायरल होत असून मुंबईचे चाहते त्याला कोणीतीही गंभीर दुखापत झाली नसावी यासाठी प्रार्थना करीत आहेत.
Suryakumar Yadav nearly lost his eye, hope he is okay. pic.twitter.com/kO1BuRSJbO
— `ash MSDian (@ashMSDIAN7) April 11, 2023
India Mr 360 . #TATAIPL2023 #MIvsDC Suryakumar Yadav #IPLonJioCinema pic.twitter.com/Zc3A2bFnPd
— Subhash Nairy (@subhashnairy) April 11, 2023
काही वर्षांपूर्वीच मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांच्या सोबत देखील क्रिकेटच्या सामन्यादरम्यान असाच अपघात घडला होता. यावेळी विकेट किपींग करत असताना बॉल जोरात स्टॅम्पवर आदळयामुळे स्टॅम्प वरचे बेल्स बाऊचर यांच्या डोळ्याला लागले होते. यामुळे त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत होऊन त्यांना बराच काळ क्रिकेट पासून दूर राहावे लागले. मार्क बाऊचर यांच्या समोर सूर्यकुमारच्या डोळ्याला बॉल लागेलला पाहून बाऊचर देखील व्यथित झालेला दिसला.